जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मानसिक आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:25 PM2018-10-03T13:25:39+5:302018-10-03T13:25:43+5:30
मनोविकारतज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
जळगाव : महात्मा गांधी जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २ आॅक्टोबर रोजी मानसिक आरोग्य शिबिर झाले.
अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी अधिष्ठात्री डॉ. योगिता बावस्कर उपस्थित होत्या. मनोविकारतज्ज्ञ डॉ. दिलीप महाजन आणि डॉ. कांचन नारखेडे यांनी मानसिक आजारासंबंधी जनजागृतीपर मार्गदर्शन केले. रुग्णालयाच्या मेट्रन सविता अग्निहोत्री आणि परिचारिका शिंदे उपस्थित होत्या.
बुवाबाजी आणि भगताकडून उपचार घेऊन उपचाराची अंधश्रद्धा न वाढवविता लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कुणालाही मनोविकारसंबंधी मनोविकारतज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून मानसिक आजारासंबंधी सल्ला घेता येतो या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात ३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. संदीप बागुल आणि मनोज नन्नवरे यांनी परिश्रम घेतले.