व्यापारी वर्गावर कृपादृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:29 AM2019-06-09T00:29:38+5:302019-06-09T00:30:26+5:30

विजयकुमार सैतवाल जळगाव : सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेत त्यांना ...

Mercantile merchandise | व्यापारी वर्गावर कृपादृष्टी

व्यापारी वर्गावर कृपादृष्टी

Next

विजयकुमार सैतवाल
जळगाव : सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेत त्यांना दर महा ३ हजार रुपये किमान निवृत्तीवेतन देण्याची घोषणा करण्यासह त्या पाठोपाठ आरटीजीएस व एनईएपटी नि:शुल्क केल्याने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्यापाºयांबाबत सकारात्मक निर्णय सरकार घेत असल्याने व्यापारी धोरण मवाळ राहणार अशी अपेक्षा केली जात आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापाºयांच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेत त्यांना दर महा ३ हजार रुपये किमान निवृत्तीवेतन देण्याची घोषणा केल्याने व्यापारी वर्गातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. यामुळे व्यापाºयांना वृद्धापकाळी आर्थिक सुरक्षा मिळून उदरनिर्वाहाची शाश्वती मिळाली आहे, असा सूर उमटत आहे. या सोबतच शपथविधी सोहळ््यातही विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाºयांना स्थान दिल्याने व्यापार क्षेत्रात सुगीचे दिवस येतील, असा विश्वासही व्यक्त होत आहे.
देशाच्या आर्थिक विकासात व्यापाºयांचे मोठे योगदान असल्याने त्यांच्या हिताच्या निर्णयाबाबत व्यापारी बांधव सरकारकडून मोठ्या अपेक्षा करीत आहे. त्यात व्यापाºयांना निवृत्ती वेतन मिळावे यासह इतरही मागण्या कॉन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्स (कैट) या संघटनेच्यावतीने करण्यात आल्या होत्या. त्यातील निवृत्तीवेतनाच्या मागणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सकारात्मक निर्णय घेत व्यापारी समुदायाला निवृत्तीवेतनाच्या कक्षेत आणणाºया नवीन योजनेला मंजुरी दिली.
या पूर्वी व्यापारी, छोटे आणि मध्यम उद्योजक यांच्या कल्याणासाठी घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. व्यापारी समुदायाचा प्रतिसाद लक्षात घेऊन जीएसटी दरात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. आता निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सर्व दुकानदार, किरकोळ व्यापारी आणि स्वयंरोजगारी व्यक्तींना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दर महा ३ हजार रुपये किमान निवृत्तीवेतनाची हमी मिळाली असल्याचे व्यापारनगरी जळगावातून त्याचे स्वागत होत आहे.
नवीन सरकारने व्यापारी वर्गास शपथविधीपासूनच मानाचे स्थान दिले असल्याचा उल्लेखही व्यापारी बांधवांनी केला. यात कॉन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्स (कैट)चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीय, सचिव प्रवीण खंडेलवाल, फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे (फॅम) अध्यक्ष विनेष मेहता, सचिव आशीष मेहता यांना शपथविथी सोहळ््यास निमंत्रित केले होते. त्यामुळे व्यापार क्षेत्रात नक्कीच सुगीचे दिवस येतील, असे व्यापारी बांधवांचे म्हणणे आहे.

Web Title: Mercantile merchandise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव