पारा घसरला पाच अंशार्पयत

By admin | Published: January 12, 2017 09:49 PM2017-01-12T21:49:50+5:302017-01-12T21:49:50+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात हुडहुडी कायम असून डाब व तोरणमाळ येथे किमान तापमान पाच अंश सेल्सीयसर्पयत जात आहे. तर सपाटीवरील भागात अर्थात शहादा, नंदुरबार तालुक्यातील तापमान सात अंशार्पयत नोंदण्यात आले आहे.

The mercury dropped to five degrees | पारा घसरला पाच अंशार्पयत

पारा घसरला पाच अंशार्पयत

Next


नंदुरबार : जिल्ह्यात हुडहुडी कायम असून डाब व तोरणमाळ येथे किमान तापमान पाच अंश सेल्सीयसर्पयत जात आहे. तर सपाटीवरील भागात अर्थात शहादा, नंदुरबार तालुक्यातील तापमान सात अंशार्पयत नोंदण्यात आले आहे. याच तालुक्यात गेल्यावर्षी 24 व 26 जानेवारी रोजी सात अंश सेल्सीयस तापमान नोंदविण्यात आले होते. दरम्यान, थंडीची तीव्रता येत्या आठ ते दहा दिवसार्पयत कायम राहणार असल्याचा अंदाज कृषी महाविद्यालयातर्फे व्यक्त करण्यात आला.
जिल्ह्यात यंदा उशीरानेच थंडीचे आगमन झाले होते. थंडीचे प्रमाण देखील निम्मे हिवाळा संपला तरी पाहिजे तसे नव्हते. त्यामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता होती. परिणामी गहू व हरभरा पिकांची उशीराने पेरणी करण्यात आली. आता गेल्या आठ दिवसांपासून थंडीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. हवेचे प्रमाण   आणि हवेचा वेग देखील जास्त असल्यामुळे गारठा प्रचंड प्रमाणात जाणवत आहे.
सर्वात कमी तापमान
यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमान 11 जानेवारी रोजी नोंदविण्यात आले. सातपुडा साखर कारखान्यात दररोज तापमानाची नोंद घेतली जाते. याशिवाय नंदुरबारातील शासकीय कृषी महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र येथेही तापमानाची नोंद होते. या तिन्ही ठिकाणी यंदाचे सर्वात कमी तापमान नोंदविण्यात आले आहे.
शहादा परिसरात सात अंश, नंदुरबार परिसरात सात ते 7.2 सेल्सीयस तापमान नोंदविण्यात आले. सातपुडय़ातील उंच ठिकाण असलेल्या तोरणमाळ आणि डाब या ठिकाणी पाच अंशार्पयत तापमान घसरले   आहे.
डाब परिसरात गेल्यावर्षी 20 ते 25 जानेवारी दरम्यान हिमकणांचा वर्षाव झाला होता. यंदा देखील या दोन्ही ठिकाणी तापमान प्रचंड घसरले आहे. येत्या काळात देखील तापमान आणखी घसरण्याची शक्यता लक्षात घेता हिमकणांचा वर्षाव होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बोचरे वारे
तापमान घसरलेले असतांनाच बोचरे वारे देखील मोठय़ा प्रमाणावर वाहत आहेत. त्यामुळेही तापमान घसरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे. हवेचा वेग प्रतीतास 10 ते 15 किलोमिटर्पयत राहत आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात        आहे.
सध्या वाहणारी हवा ही उत्तरेकडून वाहत आहे. सध्या देशाच्या उत्तर भागात बर्फवृष्टी सुरू आहे. उत्तर भागातील अर्थात हिमाचल प्रदेश, काश्मिरातील तापमान ‘उणे’ अर्थात शुन्य डिग्रीपेक्षा कमी राहत आहे. त्यामुळे त्या भागातून वाहणारे वारे बोचरे आणि थंड राहत असल्यामुळे पारा घसरण्यात आणखीच मदत होत आहे.
तोरणमाळ गारठले
राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ देखील गारठले आहे. चार ते पाच   अंश  सेल्सीयसर्पयत तापमान घसरत आहे. येत्या काळात आणखी    तापमान घसरण्याचीही शक्यता   आहे. तोरणमाळ येथील यशवंत तलावातील पाणी देखील गोठणबिंदूर्पयत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रब्बीला फायदा
वाढत्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे. गहू आणि हरभरा या पिकांना थंडीची आवश्यकता असते. सुरुवातीच्या काळात थंडी कमी असल्याने हे दोन्ही पिके पाहिजे तसे तरारली नव्हती. आता मात्र गहू आणि हरभरा चांगलेच बहरले असून शेतक:यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Web Title: The mercury dropped to five degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.