अमळनेरात विद्याथ्र्यानी दिला वृक्ष जगविण्याचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:20 PM2017-08-17T13:20:34+5:302017-08-17T13:21:13+5:30
हजारो विद्याथ्र्याचा सहभाग
ऑनलाईन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि. 17 - येथे मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे गुरुवारी सकाळी वृक्षदिंडी काढण्यात आली. यात शहरातील सर्वच शाळांचे सुमारे तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी ‘वृक्ष लावा वृक्ष जगवा’चा संदेश विद्याथ्र्यानी दिला. पर्यावरणविषयी जनजागृती करणे हा या दिंडीचा प्रमुख उद्देशहोता.
सकाळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षाचे पूजन केले. त्यानंतर आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्यासह विविध पदाधिका:यांनी हिरवा ङोंडा दाखविल्यानंतर वृक्ष दिंडीस प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची विशेष उपस्थिती होती.
सानेगुरूजी विद्या मंदिरापासून ही दिंडी सुरू झाली. दिंडीच्या अग्रभागी प्रताप हायस्कुलची पालखी होती. ढोलताशे व लेझीम पथकाने शहरवासियांचे लक्ष वेघून घेतले होते. यादिंडीत कलशधारी विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. तसेच वाडी संस्थानमधील पाठशाळेचे विद्यार्थीही पारंपारिक वेशात सहभागी झालेले होते.उर्दू शाळेच्या विद्यार्थीनींचीही संख्या लक्षणीय होती. दिंडीच्या मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढलेल्या होत्या.
दरम्यान ¨दंडी सुरू असतांनाच पावसाचे आगमन झाले. भर पावसात ही दिंडी मार्गक्रमण करीत होती. विद्यार्थी पावसात भिजले तरी, दिंडी सुरूच होती.
वृक्षदिंडी स्टेशनरोड, नगरपालिका, सुभाष चौक,राणी लक्ष्मीचौक, दगडी दरवाजा, पानखिडकीमार्गे वाडी चौकात पोहचली. त्याठिकाणी चिनी वस्तुंवर बहिष्काराची विद्याथ्र्यानी शपथ घेतली. त्यानंतर वृक्षदिंडीचा समारोप झाला. या वृक्षदिंडीत शहरातील जवळपास तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
ही वृक्षदिंडी यशस्वीतेसाठी मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.