प्रभातफेरीतून दिला एचआयव्ही निर्मूलनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 08:20 PM2019-12-02T20:20:25+5:302019-12-02T20:21:08+5:30
जळगाव :जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण केंद्रामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले़ यात विद्यार्थ्यांची प्रभातफेरी ...
जळगाव :जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण केंद्रामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले़ यात विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली़ यासह पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले होते़
प्रभातफेरीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जे. सानप यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यात ध्वनीफितीद्वारे व विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या़ बेंडाळे चौक मार्गे, शिवतीर्थ मैदान,आऱ आऱ विद्यालय व पुन्हा जिल्हा रूग्णालय अशी ही प्रभातफेरी काढण्यात आली़
याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु पी. पी. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय परदेशी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव ठोंबरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर आदी उपस्थित होते़
आकाशात फुगे सोडून सप्ताहास सुरुवात करण्यात आली. दिशा फाउंडेशनचे विनोद ढगे यांच्या चमूने पथनाट्य सादर केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते़