अमळनेरला स्नेहसमेलनातून देशभक्ती व जनजागृतीचे संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 02:50 PM2020-01-19T14:50:22+5:302020-01-19T14:51:21+5:30

अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जल्लोषात पार पडला.

A message of patriotism and awareness through affection for Amalner | अमळनेरला स्नेहसमेलनातून देशभक्ती व जनजागृतीचे संदेश

अमळनेरला स्नेहसमेलनातून देशभक्ती व जनजागृतीचे संदेश

Next
ठळक मुद्देअलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहातमान्यवरांनी केले विद्यार्थिनींचे कौतुकगुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान

अमळनेर, जि.जळगाव : अलफैज उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्युनिर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जल्लोषात पार पडला. यात विद्यार्थिनींनी देशभक्ती व जनजागृतीचे संदेश दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल भाईदास पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे आमदार स्मिता वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, ग्रंथपाल विभागाचे प्रदेशाध्यक्ष उन्मेष पाटील, ग्रंथपाल विभाग सचिव व महिला प्रदेशाध्यक्षा रिता बाविस्कर, अनिल शिसोदे, नगरसेवक बबली पाठक, फिरोजखॉ मिस्तरी तसेच संस्थाअध्यक्षा हाफिज बिस्मिल्ला, चेअरमन शब्बीरअली, सचिव शरीफ शेख, सदस्य सलीम शेख, प्राचार्या खान अनीसा व पालक उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमातून सर्व धर्म समभाव, लोक कल्याणकारी, जनजागृती, देशभक्तीपर संदेश दिले. सर्व मान्यवरानी विद्यार्थिनीचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रमात मान्यवराचा हस्ते शालेय स्तरावर विविध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष बक्षीस राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेली विद्यार्थिनी मसिरा नाज मुश्ताक मनियार हिला देण्यात आले.
सूत्रसंचालन सानिया बागवान व सामिया शेख यांनी केले. इब्राहिम शेख यांनी आभार मानले.

Web Title: A message of patriotism and awareness through affection for Amalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.