निरोप मुलगा झाल्याचा, हाती दिली मुलगी

By admin | Published: February 16, 2017 12:37 AM2017-02-16T00:37:37+5:302017-02-16T00:37:37+5:30

जिल्हा रुग्णालय : मुलगा की मुलगीच्या संभ्रमाने नातेवाईक चिंतीत

The message went to the boy, handed over to the girl | निरोप मुलगा झाल्याचा, हाती दिली मुलगी

निरोप मुलगा झाल्याचा, हाती दिली मुलगी

Next


जळगाव : जिल्हा रुग्णालयात महिलेची प्रसूती झाल्यानंतर मुलगा झाल्याचा निरोप नातेवाईकांना मिळाला मात्र प्रत्यक्ष हाती मुलगी देण्यात आल्याने नातेवाईक चिंतीत होऊन या विषयी बराच वेळ गोंधळ निर्माण झाल्याचा प्रकार बुधवारी जिल्हा रुग्णालयात घडला. अखेर मुलगीच झाल्याची खात्री पटल्याने चिंतेचे वातावरण निवळले.
बुधवारी जिल्हा रुग्णालयात दोन महिलांच्या प्रसूती एकापाठोपाठ झाल्या. यात एका महिलेला मुलगा झाला तर दुसरीला मुलगी झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील कर्मचा:याने ज्यांना मुलगी झाली त्या नातेवाईकांना निरोप दिला तो मुलगा झाल्याचा. मात्र काही वेळाने प्रत्यक्ष बाळ ज्या वेळी हाती देण्यात आले त्या वेळी ती मुलगी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे नातेवाईक चिंतेत पडले व आपले बाळ बदल्याची त्यांना शंका आली. या बाबत त्यांनी तेथे विचारणा केली असता त्यांना सांगण्यात आले की, तुम्हाला मुलगीच झाली आहे. मात्र कर्मचा:याने मुलगा झाल्याचे सांगितल्याचे नातेवाईकांनी लक्षात आणून दिले. त्यावर या कर्मचा:याने ज्यांना मुलगा झाला त्याचे नातेवाईक असल्याचे समजून तुम्हाला सांगितले, असे स्पष्ट करण्यात आले.
या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात बाळ बदल झाल्याची जोरदार चर्चा होती.  मात्र प्रत्यक्षात बाळ बदलले नाही तर निरोप चुकीचा दिल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे  स्पष्ट झाले.
नातेवाईकांचीही तक्रार नाही
या बाबत संबंधित नातेवाईकांशी चर्चा केली असता काही वेळ गैरसमज झाला होता. मात्र मुलगीच झाल्याची खात्री पटली असून बाळ बदलाचा कोणताच प्रकार नसल्याचे व कोणतीही तक्रार नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

आईनेही ओळखले
नंतर प्रसूत महिलेनेही आपले बाळ ओळखून मुलगीच झाली असून ती आपल्याला दाखविण्यात आली होती, असे  सांगितले.
पेढेही वाटप
मुलगा झाल्याचा निरोप मिळाल्यानंतर संबंधित नातेवाईकांनी पेढेदेखील वाटप केले. मात्र मुलगा नसल्याचे त्यांच्या नंतर लक्षात आले.

Web Title: The message went to the boy, handed over to the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.