म्हसाळा धरणातून पाण्याची सर्रास चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2017 12:26 AM2017-03-08T00:26:55+5:302017-03-08T00:26:55+5:30

धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर : पाणी टंचाईचे सावट, कारवाईची मागणी

Mhasalala damaged the water from the common cold | म्हसाळा धरणातून पाण्याची सर्रास चोरी

म्हसाळा धरणातून पाण्याची सर्रास चोरी

Next

कुºहाड ता.पाचोरा : कोकडी  शिवारातील म्हसाळा धरण सध्या दुर्लक्षित आहे. या धरणाची दुर्दशा वाढतच  आहे.  यंदा १०० टक्के भरलेले  धरण हे चुकीच्या नियोजनामुळे तसेच प्रचंड पाणी चोरीमुळे कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागले आहे.
सध्या या धरणात मृतसाठा वगळता आता केवळ १० टक्के जलसाठा असून ३५-४० वीज पंप लावून पाणी चोरी सर्रासपणे केली जात आहे. याचा परिणाम प्रत्येक गावाच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे.  कुºहाड येथे ८-१० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. जर हे धरणातील वीज पंप जप्त केले नाही तर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणारा आहे. याकडे अधिकाºयांनी वेळीच लक्ष दिले नाही तर  नागरिकांसाठी तसेच गुरांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
धरण भिंतीवर काटेरी झुडुपे
या धरणाच्या भिंतीवर झाडांचे अतिक्रमण झाले असून याच्या मुळ्या धरणाच्या भिंतीत खोलवर गेल्या आहेत. यामुळे या भिंतीला कधीही तडा पडू शकतो.  या धरणाचे काम १९७२ मध्ये झाले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी दुरुस्ती करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेता धरणाच्या दुरुस्तीसाठी काही शेतकºयांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दोन वर्षापासून पाठपुरावाही केला आहे. मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
पाटचारी स्वच्छता स्वखर्चाने
गावातील शेतकरी व धरणाचा  गेटमन रतन संपत माळी याने गतवर्षी उन्हळ्यात ४० हजार रु. खर्चून धरणापासून १ कि.मी.पावेतो पाटचारीचा गाळ जेसीबीने काढला होता,  परंतु त्याचा मोबदला या शेतकºयाला शासनाकडून मिळालेला नाही. बºयाचशा पाटचारीमधील गाळासह दुरुस्ती, पाईप लिकेज अजूनही बाकी आहे. याकडे त्वरित लक्ष देण्याची  गरज आहे. या धरणावर पाण्याची नवीन विहीर खोदून लवकरात लवकर गावाला ३-४ दिवसाआड  पाणी देऊ तसेच या विहिरीवर  स्वतंत्र डीपी बसवून देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
यंदा पावसाळयात १०० टक्के भरेलल्ल्या या धरणात सध्या केवळ  १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. धरणावरुन ७०० एकर शेती क्षेत्र कालवा प्रवाहासाठी आहे. यंदा हे पाणी दिवाळीनंतर दोन महिन्यांनी पाटचारीने सोडले असता बरेचसे पाणी चाºयांद्वारे  गळती होऊन  वाया गेले. शेतºयांनी या धरणाच्या पाण्यावर पिकांची लागवड केली परंतु पाणीसाठा संपल्याने ही पिके सुकू लागली आहेत. या धरणाहून कळमसरा, कोकडीतांडा, कुºहा खु।। बु।।, अंबेवडगाव, जोगे अशा गावांना पाणीपुरवठा होतो.  परंतु पाटबंधारे  अधिकाºयांचे दुर्लक्षामुळे जलसाठा हा आरक्षणापेक्षाही एक फूट खाली आहे.  या धरणाची करवसुली प्रत्येक वर्षी १,३०,०००  रु. अशी आहे. एवढा शेती पाण्याचा सारा मिळूनही या धरणाकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष असल्याने हे धरण अखेरची घटका मोजत आहे.

Web Title: Mhasalala damaged the water from the common cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.