शिवसेनेतर्फे भुसावळात एमएचटी-सीईटी अर्ज नोंदणी सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:17+5:302021-06-17T04:12:17+5:30
शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, नितीन माळी, प्रवीण चौधरी, जयेश चौधरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. शैक्षणिक ...
शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, नितीन माळी, प्रवीण चौधरी, जयेश चौधरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी २०२१ ही प्रवेश परीक्षा देणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ८ जून ते ७ जुलै २०२१ पर्यंत तर विलंब शुल्कासह अर्जाच्या नोंदणीसाठी ८ जुलै २०२१ ते १५ जुलै २०२१ असा कालावधी दिला आहे.
या परीक्षेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहितीपुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांकडून या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यात बऱ्याचदा चुका होत असतात आणि धावपळही होत असते. त्यादृष्टीने शहर शिवसेनेने एमएचटी-सीईटी २०२१ साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. हे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रे, ओळखपत्र/आधार कार्ड, फोटो आणि अर्जाचे शुल्क भरण्यासाठी एटीएमसोबत आणणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.