मायक्रोसिफेली आजारामुळे ऋतिक अन् रोहिणी जगावेगळे
By admin | Published: May 2, 2017 01:24 PM2017-05-02T13:24:02+5:302017-05-02T13:24:02+5:30
मुलांच्या उपचारासाठी मातापित्यांची पायपीट : असलोद येथील बहिण भावाला दुर्धर आजार
Next
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.2 - चार वर्षाची रोहिणी आणि दोन वर्षाचा ऋतिक यांना पाहून केवळ दया हीच भावना मनात बळावत़े वय वाढून शारिरिक वाढ खुंटणा:या ‘मायक्रोसिफेली’ आजाराने ग्रस्त या दोघा बहिण भावाची शिबिरात वैद्यकीय तज्ञांनी तपासणी करून त्यांना पुढील उपचार घेण्याचे सुचवले आह़े
शहादा तालुक्यातील असलोद येथील अंबर आणि संतोषी भिल या दाम्पत्याचा पाच वर्षापूर्वी विवाह झाला होता़ विवाहाच्या वर्षभरानंतर त्यांच्या घरात कन्यारत्न जन्मास आल़े जन्माला आलेली कन्या पाहून पतीपत्नीला आनंद झाला होता़ या दाम्पत्याने मुलीचे नाव रोहिणी ठेवले. मात्र हा आनंद अल्पकाळ टिकला़ रोहिणाचा सहा महिन्यानंतर शारिरिक विकास न झाल्याने मातापित्यांनी डॉक्टरांना दाखवून उपचार करून घेतल़े मात्र अखेरीस रोहिणीला मायक्रोसिफेली हा दुर्धर आजार निदान झाले. वय वाढूनही शारिरिक विकास न होणे, गुणसूत्र आणि हार्मोन्समध्ये बदल होणे. यामुळे होणा:या या आजारामुळे चार वर्षे वय असूनही रोहिणी ही दोन वर्षाची असल्याचे दिसून येत़े जन्माला आलेली मुलगी एकीकडे अशा दुर्धर आजाराने त्रस्त असताना दोन वर्षानी संतोषी यांनी मुलाला जन्म दिला़ सुरूवातीला शरीराने सुदृढ असलेल्या या बालकाला ऋतिक असे नाव त्यांनी दिले होत़े सहा महिने झाल्यानंतरही ऋतिकची शारीरिक वाढ खुंटल्याचे जाणवले. त्यालाही डॉक्टरांकडे नेले असता, त्यालाही मायक्रोसिफेली हा आजार समजल्यानंतर मात्र दोघांच्या डोक्यावर आभाळच कोसळल़े़़ बांधकामावर कामगार म्हणून काम करणारे अंबर भिल आणि शेतमजूर असलेली त्यांची पत्नी संतोषी हे वणवण भटकून दोघांवर कोणी मोफत उपचार करेल, का, या आशेने शिबिरांना जात आहेत़ नंदुरबार येथे गेल्या आठवडय़ात झालेल्या महाआरोग्य शिबिरात सकाळी आलेल्या संतोषी यांनी दोन्ही मुलांची नोंदणी केल्यावर दुपारी मुंबई येथील ज़ेज़ेरूग्णालयाच्या बालरोग तज्ञ डॉ़ सुळे यांनी दोघांची तपासणी करून उपचार सुचवले आहेत़ मात्र पुढील उपचारांसाठी दुस:या शहरात जाण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसल्याचे त्यांनी सांगितल़े