भुसावळात लहान मुलांनी बनवली किल्ल्याची प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 04:11 PM2018-11-10T16:11:46+5:302018-11-10T16:12:40+5:30
भुसावळ शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील फालक वॉर्डात लहान मुलांनी रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनविली आहे.
भुसावळ, जि.जळगाव : शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील फालक वॉर्डात लहान मुलांनी रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनविली आहे. कन्हैया राठोड, सुजल फालक, साहील फालक यांनी तो तयार केला आहे.
या किल्ल्यामध्ये गंगासागर, भोलेनाथ मंदिर व शिवाजी महाराजांची समाधी दाखवण्यात आली आहे. पुणे येथून मावळ्यांचे स्टेच्यू मागवले होते. याशिवाय या किल्ल्यात शेती व विहीर व बैलगाडीही दाखवण्यात आली आहे. किल्ल्यात हुबेहुब कबूतरही ठेवण्यात आले आहेत. शिवाजी महाराजांचा देखणा पुतळा उपस्थितांचे लक्ष वेधून घेतो. याशिवाय शिवाजी महाराजांची छायाचित्रे लावून त्यात त्यांचे बालपण दाखवण्यात आले आहे. किल्ल्याची संकल्पना सुजल फालक याने केली.