पहूरच्या अवैध धंद्यांचे औरंगाबाद हद्दीत स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 05:57 PM2018-11-29T17:57:51+5:302018-11-29T18:00:20+5:30

अवैध धंद्यांच्या विरोधात पहूर पोलिसांची कारवाई आणि लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे औरंगाबाद ग्रामीण हद्दीत स्थलांतरीत झाले आहे.

Migrant illegal trades moved to Aurangabad border | पहूरच्या अवैध धंद्यांचे औरंगाबाद हद्दीत स्थलांतर

पहूरच्या अवैध धंद्यांचे औरंगाबाद हद्दीत स्थलांतर

Next
ठळक मुद्देपोलीस कारवाईच्या भीतीने सर्वत्र सन्नाटाअवैध धंदे सुरू राहिल्यास बिट हवालदारांवर कारवाईचा इशारासाहाय्यक पोलीस निरीक्षकांनी केली कर्मचाऱ्यांची कानउघाडणी

पहूर ता जामनेर : अवैध धंद्यांच्या विरोधात पहूर पोलिसांची कारवाई आणि लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे औरंगाबाद ग्रामीण हद्दीत स्थलांतरीत झाले आहे. त्यामुळे अवैध धंद्याच्या ठिकाणी सन्नाटा पसरला आहे.
अवैध धंद्यांविरोधात पहूर पोलिसांनी वॉश आऊट मोहिम हाती घेतली असताना पहूरमध्ये मात्र अवैध धंदे सुरु होते. याबाबत गुरुवार २९ रोजी ‘लोकमत’मध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या कारवाईच्या भीतीने अवैध धंदेचालकांनी धंदे बंद ठेवले होते. त्यामुळे सर्वच ठिकाणी सन्नाटा पसरला होता.
कारवाईच्या भितीने पहूर येथील अवैध धंदेचालकांनी कारवाई अगोदरच पलायन करीत औरंगाबाद जिल्ह्यात स्थलांतरित झाल्याची माहिती मिळाली आहे.
ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरु असतील त्यासाठी संबधित बीट हवालदाराला दोषी धरून त्याच्यावर कारवाई करून पोलीस अधीक्षकांकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे. यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही अशा शब्दात साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट यांनी कर्मचाºयांची कानउघाडणी केली.

Web Title: Migrant illegal trades moved to Aurangabad border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.