कोरोनाच्या भीतीने कुºहाड ग्रामस्थांचे शेतांमध्ये स्थलातर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 08:12 PM2020-03-30T20:12:02+5:302020-03-30T20:13:07+5:30
सद्य:स्थितीत हैराण करून सोडलेल्या कोरोनाच्या भीतीने येथील अनेक कुटुंबांनी थेट शेतांमध्ये स्थलांतर केले आहे.
कुºहाड, ता.पाचोरा, जि.जळगाव : सद्य:स्थितीत हैराण करून सोडलेल्या कोरोनाच्या भीतीने येथील अनेक कुटुंबांनी थेट शेतांमध्ये स्थलांतर केले आहे.
गेल्या चार दिवसात सुमारे पन्नास ते साठ कुटुंबे त्यांच्या स्वत:च्या शेतांमध्ये पत्र्याचे तात्पुरते शेड उभारून राहत आहेत. दररोज गावातील रहिवाशांचा लोंढा शेतामध्ये रवाना होत आहे. याचे कारण असे गावात संचारबंदी असूनदेखील नागरिक घराबाहेर फिरत असतात.
याशिवाय गावात दररोज रात्रीच्या वेळेस बाहेर गावाहून पुणे, मुंबई, गुजरात आदी ठिकाणाहून लोक येत आहेत आणि या लोकांच्या संपर्कात न यावे म्हणून गावातील व परिसरातील अनेक ग्रामस्थांनी शेतात राहण्याचा निर्णय घेतला.
जोपर्यंत या आजाराचे निर्मूलन होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या १५ लोकांच्या कुटुंबासह शेतात राहण्याचा निर्णय घेतला.
-नाना शंकर हिरे, कुटुंबप्रमुख, कुºहाड खुर्द, ता.पाचोरा