जामनेरला परिचारिकेस सौम्य स्वरूपाची रिॲक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:47 PM2021-01-16T16:47:21+5:302021-01-16T16:48:02+5:30
काेरोनाचे लसीकरण केल्याने एका परिचारिकेला साैम्य स्वरुपाची रिॲक्शन आली.
Next
ठळक मुद्देलशीनंतर घशाला कोरड व खोकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : लसीकरणानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका आशा तायडे यांना सौम्य स्वरुपाची रिॲक्शन झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी दिली. लस घेतल्यानंतर तायडे यांच्या घशाला कोरड पडली व कोरडा खोकला येत असल्याचे दिसून आल्याने औषधोपचार करण्यात आले. अर्ध्या तासानंतर त्यांना घरी पाठविण्यात आल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.