25 कि.मी.चा रेल्वे मार्ग मैलाचा दगड
By admin | Published: May 27, 2017 11:21 AM2017-05-27T11:21:28+5:302017-05-27T11:21:28+5:30
केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण होत असल्याने या काळातील कामकाजाचा घेतलेला आढावा.
Next
ऑनलाईन लोकमत/ पंढरीनाथ गवळी, रमाकांत पाटील
भुसावळ/नंदुरबार,दि.28- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ-जळगाव हा 25 किलोमीटर लांबीचा नवीन तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग रेल्वेच्या विकासातील व खान्देशच्या विकासात भर घालणारा मैलाचा दगड ठरणार आहे. ब्रिटिश काळानंतर प्रथमच या विभागात नवीन रेल्वे मार्ग अंथरण्यात येत आहे. या तिस:या आणि चौथ्या मार्गामुळे रेल्वेची वाहतूक जलद होऊन प्रवासी व मालवाहतूक सुकर होणार आहे. रेल्वेचे उत्पन्नही वाढणार आहे. दरम्यान, या रेल्वे मार्गामुळे येथील रेल्वे यार्डाचे आधुनिकीकरण व जळगाव येथील रेल्वेस्थानकाचाही विस्तार केला जात आहे.
भुसावळ-जळगाव या तिस:या मार्गाचे काम दोन टप्प्यात होणार आहे. भादली-भुसावळ हा 12.65 कि. मी. लांबीचा मार्ग मार्च 2018 मध्ये पूर्ण करण्यात येणार आहे, तर भादली-जळगाव हा 11.51 कि.मी.लांबीचा रेल्वे मार्ग मार्च 2019 मध्ये पूर्ण होईल.
भुसावळ येथून तिसरा रेल्वे मार्ग जळगावकडे जाताना ‘अप’ दिशेने तरसोदर्पयत जाईल. तरसोदपासून तो पुढे डाऊन दिशेने जळगावर्पयत जाईल. जळगाव येथे हा मार्ग व्हीआयपी फलाटाच्या दोन्ही बाजूंनी जाईल.
सुरत-भुसावळ रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे ेसद्यस्थितीत व्यारा ते सोनगड व सोनगड ते चिंचपाडार्पयतचे काम पूर्ण झाले आहे. धरणगाव ते बेटावदर्पयतचे दुहेरीकरणाचे काम झाले आहे. अमळनेर ते होळ या मार्गाचे कामही पूर्ण होऊन त्याचे इन्स्पेक्शन नुकतेच करण्यात आले. महिनाभरात या मार्गावरील वाहतूकही सुरू होईल. तथापि, चलठाण ते उधना, होळ ते नंदुरबार आणि पाळधी ते जळगाव या तीन टप्प्यातील जवळपास 80 किलोमीटरपेक्षा अधिक कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. या कामांसाठी निधी मिळाल्यास कामाला गती मिळू शकेल. यापूर्वीच या प्रकल्पाचा खर्च प्रचंड वाढला आहे. अजून विलंब झाल्यास खर्च वाढेल. त्यामुळे या कामाला आता गती देऊन किमान मार्च 2018 र्पयत हा रेल्वेमार्ग एकदाचा पूर्ण दुहेरी करावा, अशी अपेक्षा आहे.
आशिया खंडातील दुस:या क्रमांकाचे मार्शल यार्ड असलेल्या मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नवीन रेल्वे मार्ग अंथरण्यासह विविध प्रकल्पांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात अतिशय वेगाने चालना मिळाली आहे. यातीलच एक अतिशय महत्त्वाकांक्षी आणि भुसावळ-जळगाव व एकूण रेल्वेला आर्थिकदृष्टय़ा संपन्न करणारा भुसावळ-जळगाव हा तिसरा व चौथा रेल्वे मार्ग येत्या दोन वर्षात बांधून पूर्ण तयार होणार आहे. दरम्यान, प्रत्यक्ष रूळ अंथरण्याच्या कामास येत्या सहा महिन्यांत प्रारंभ होणार आहे.