Milk Supply : जळगाव येथून मुंबईला पोलीस बंदोबस्तात दूध रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:06 PM2018-07-18T12:06:59+5:302018-07-18T12:09:35+5:30
संकलनावर परिणाम नाही
जळगाव : स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूधाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलेले असताना जिल्हा दूध संघाच्या दूध संकलनावर त्याचा परिणाम झालेला नाही. मुंबईसाठी जळगावहून १२ हजार लिटर दूध पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दररोज होते तेवढेच म्हणजे २ लाख ३० हजार लिटर दूधाचे संकलन जिल्हा दूध संघात झाले असून त्यापैकी १ लाख ७७ हजार लिटर दूध शहरातच विक्री करण्यात आले. तर १२ हजार लिटर दूध मुंबईला पोलीस बंदोबस्तात पाठविण्यात आले. त्यासाठी जळगाव, धुळे, नाशिक पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. याखेरीज औरंगाबाद, नाशिक, बुलढाणा, अकोला, धुळे, जालना आदी ठिकाणीही जिल्हा दूध संघातर्फे दूध पुरवठा केला जातो. ती वाहनेही पोलीस बंदोबस्तात रवाना होत आहेत.
बुलढाण्याकडे झाली तोडफोड
मुंबईसह ७-८ जिल्ह्यांमध्ये जिल्हा दूध संघाकडून दुधाचा पुरवठा होत असताना बुलढाणा परिसरातच केवळ दूध संघाच्या वाहनाच्या तोडफोडीचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले.