राज्यातील दूध संघ प्रचंड स्पर्धेमुळे अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 09:17 PM2018-08-25T21:17:32+5:302018-08-25T21:19:05+5:30
प्रचंड स्पर्धेमुळे राज्यभरातील दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्हा दूध संघही अडचणीत आले आहेत. अशा स्थितीत जळगाव जिल्हा दूध संघ चांगली वाटचाल करीत आहे. अशा स्थितीत टिकण्यासाठी गुणवत्ता हीच महत्वाची आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी केले.
जळगाव- प्रचंड स्पर्धेमुळे राज्यभरातील दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्हा दूध संघही अडचणीत आले आहेत. अशा स्थितीत जळगाव जिल्हा दूध संघ चांगली वाटचाल करीत आहे. अशा स्थितीत टिकण्यासाठी गुणवत्ता हीच महत्वाची आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी केले.
जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सभेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ही सभा दूध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली. यावेळी सर्व विषय बिनविरोध मंजूर करण्यात आले. याचवेळी गेल्या वर्षभराच्या दूध खरेदीचा ५० पैसे प्रति लिटर फरक शेतकऱ्यांना देणार आहोत, अशी घोषणा खडसे यांंनी संघाच्यावतीने केली.
राजू शेट्टी यांचे अभिनंदनाचा ठराव
दूध उत्पादकांना खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे वाढीव भाव सरकारने जाहीर केल्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा ठराव सभासदाच्या मागणीवरुन करण्यात आला.
व्यापाºयांचे दूध जिल्हा दूध संघात
जिल्हा दूध संघाचे काही संचालक तसेच दूध सोसायटीचे पदाधिकारी हे व्यापाºयांचे दूध जिल्हा दूध संघात पाठवतात व तेही स्वीकारण्यात येते असा आरोप दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींनी सभेत केला. त्याचे खंडन दूध संघाच्या अधिकारी व संचालकांनी यावेळी केले.