गिरणा धरण रब्बी आवर्तनात निम्मे खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 01:49 AM2021-02-27T01:49:41+5:302021-02-27T01:51:52+5:30

संजय हिरे खेडगाव, ता. भडगाव : गिरणा धरणातून मागील तीन महिने रब्बीत सिंचनासाठी आवर्तन देण्यात आले. यंदा २१५०० द.ल.घ.फु. ...

The mill dam halfway down the rabbi cycle | गिरणा धरण रब्बी आवर्तनात निम्मे खाली

गिरणा धरण रब्बी आवर्तनात निम्मे खाली

Next

संजय हिरे
खेडगाव, ता.भडगाव : गिरणा धरणातून मागील तीन महिने रब्बीत सिंचनासाठी आवर्तन देण्यात आले. यंदा २१५०० द.ल.घ.फु. म्हणजे १०० टक्के जलसाठा झाला होता. आजमितीस धरणात १२५९१ द.ल.घ.फु. इतका अर्थात मृतसाठा धरुन जवळजवळ ५०-५१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
रब्बीसाठी गिरणा लाभक्षेत्रातील पाझंण, जामदा डावा-उजवा व दहीगाव कालव्यांना तीन आवर्तन देण्यात आले. ५ डिसेंबर रोजी गिरणा धरणातून आवर्तन सुरू झाले. रब्बी आवर्तनाचा कालावधी २८ फेब्रुवारीपर्यंत असतो. यात तीन आवर्तन देण्यात आले जवळजवळ ८-९ हजार द.ल.घ.फु. जलसाठा यात वापरला गेला. रब्बीसाठी सुरू असलेले आवर्तन दहिगाव व जामदा उजवा कालव्यातून थांबविण्यात आले आहे तर जामदा डावा व पांझण कालव्याचे आवर्तन शेवटच्या टप्प्यात आहे. दोन-चार दिवसात आवर्तनाचा शेवट होईल. गिरणा धरणातून मंगळवारपासून आवर्तनाचे पाणी कमी करण्यात येवून ५०० क्युसेसने सोडले जात आहे. ते जामदा डावा कालव्यातून तळई फाट्याच्या शेवटच्या सिंचनासाठी वापरले जात आहे. ते आटोपताच गिरणा धरणातून आवर्तन बंद होईल.
उन्हाळी हंगाच्या नियोजनाअभावी पाणी मागणीत घट
मागील व यावर्षी असे लागोपाठ दोन वर्षात गिरणा धरणात १०० टक्के जलसाठा झाला. त्याचप्रमाणे गिरणा लाभक्षेत्रातदेखील चांगला पावसाळा झाल्याने, विहिरींना जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पाणी टिकेल, अशी स्थिती होती. हे पाहता पालकमंत्री, पाटबंधारे विभाग, कालवा समिती यांनी उन्हाळी हंगामाचे नियोजन करायला हवे होते. उन्हाळ्यात विहीरींचे पाणी कमी होते.यामुळे कालव्याचे पाणी मागणीत निश्चितच वाढ अपेक्षित होती.निदान मागील वर्षाच्या अनुभवानुसार तरी यावर्षी उन्हाळी हंगामाचे नियोजन करण्याची गरज होती.परंतु मागील पानावरुन पुढे चालू या पध्दतीने रब्बीचाच २८फेब्रुवारीचाच पाढा वाचला गेला.मागील वर्षी २७००० हेक्टरवर क्षेत्र भिजल्याचे (पाणी मागणी अर्ज आल्याचे) सांगितले गेले. यावर्षी तीस-या पाण्यानंतरची शाखा परत्वे मागणी क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी २१०००-२२००० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी मागणी आजवर झाल्याचा अंदाज आहे. गिरणा धरणाची रब्बीत एक लाख हेक्टरवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष सिंचनक्षमता असतांना दुप्पट -तिप्पट पाणी मागणी का घटली? यावरुन उन्हाळी हंगामाचे नियोजन सुरवातीलाच व्हायला हवे होते. याचा विचार नियोजन कर्त्यांनी करायला हवा.
५० टक्के पाण्याचे काय करायचे?
गिरणा धरणात जवळजवळ ५० टक्के जलसाठा शिल्लक आहे. पुढील चार-पाच महिने पिण्यासाठी राखीव ठेवूनही पाणी शिल्लक राहणार आहे. गहू, हरभरा आता पक्व झालेला आहे. पाच तालुक्यात उशिराने पेरणी झालेल्या पिकांना पाण्याची गरज खरोखर आहे काय?ते क्षेत्र किती? त्या शेतक-यांनी पाणी मागणी अर्ज भरलेले आहेत काय? हे तपासणे आवश्यक आहे. विहिरींची सोय असलेल्यांनीच रब्बी-उन्हाळी ज्वारी, बाजरी घेण्याची रिस्क घेतली आहे. यातील निन्म्या शेतक-यांनी पाणी मागणी अर्जच भरलेले नाहीत. कालव्यांना सोडलेल्या पाण्याचा आपसुक लाभ या शेतक-यांना होतो मग अर्ज भरण्याची तसदी ते घेत नाही.आता गिरणा धरणातील शिल्लक जलसाठा मागे ठेवायचा की या शेतक-यांसाठी सोडायचा? का २००६-२००८ या सालाप्रमाणे मे-जून असा उन्हाळी कपाशीचा फाँर्म्युला अंमलात आणायचा त्याप्रमाणे नियोजन आता करणे गरजेचे आहे.

Web Title: The mill dam halfway down the rabbi cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.