गिरणा धरणात ५१.३२ टक्के पाणी साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 09:25 PM2019-08-06T21:25:16+5:302019-08-06T21:25:59+5:30
पाण्याचा जोरदार ओघ
चाळीसगाव - नाशिक जिल्ह्यातील चणकापूर, पुनद, ठेंगोडा, हरणबारी, केळझर या पाच प्रकल्पांमधून गिरणा धरणात पाणी मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने गिरणा धरणात मंगळवारी सायंकाळी ६ पर्यंत एकूण ५१.३२ टक्के जलसाठा झाला. चनकापूर धरणातून १०६१२ क्येसूस, पुनद मधून ८६३ क्येसूस, ठेंगोडा मधून १३६१० क्येसूस, हरणबारी मधून ३६८९ तर केळझर मधून १३६४ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू गिरणा धरणात सुरु आहे. यामुळे ६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत गिरणा धरणात १२ हजार ४९४ दलघफू इतका पाणी साठा झाला. नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने आणखी या धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे अभियंता हेमंत पाटील,शाखा अभियंता एस. आर.पाटील यांनी दिली.