जळगावात कारागृहातून सुटताच लांबविला लाखोचा कॅमेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:35 AM2019-06-02T11:35:52+5:302019-06-02T11:38:43+5:30
‘सीसीटीव्ही’मुळे अट्टल चोरटा जाळ्यात
जळगाव : कॅमेरा चोरीच्या गुन्ह्यात कारागृृहातून सुटताच आणखी एक लाख रुपयांचा कॅमेरा लांबवून त्याची अवघ्या पाच हजारात विक्री करणाऱ्या चोरट्याच्या शहर पोलिसांनी शनिवारी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्याने त्याला ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करताना शहर पोलिसांनी शनिवारी पाळधी, ता.जामनेर गावाजवळ पकडला. अक्षय प्रकाश छाडेकर (२१, रा.पाळधी, ता.जामनेर) असे चोरट्याचे नाव आहे.
ग्राहकांना दुकानात बसवून थोड्यावेळासाठी बाहेर गेलेल्या सतीश मार्तंड जगताप (रा.प्रभात चौक, जळगाव) यांचा एक लाख रुपये किमतीचा कॅमेरा नवी पेठेतील मार्तंड फोटो स्टुडीओतून लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती.
दरम्यान, या आठवड्यात आणखी गणेश जोशी, चेतन अंभोरे यांचेही कॅमेरे चोरी झालेले आहेत. समाधान जगन सोनवणे या व्यावसायिकाची हार्ड डिस्क चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी जगताप यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल झाला.
अक्षयवर आठ गुन्हे
अक्षय छाडेकर याच्याविरुध्द चोरी व घरफोडीचे आठ गुन्हे दाखल आहे. गेल्या आठवड्यातच तो कॅमेºया चोरीच्या गुन्ह्यातून कारागृहातून जामीनावर सुटला होता. त्यानंतर लगेच त्याने जगताप यांचा कॅमेरा लांबविला. अक्षय याला जुगाराचे व्यसन आहे, त्यामुळेच तो चोºया करतो. त्याच्या परिवारातील इतर नातेवाईक सरकारी नोकरीला आहेत. जगताप यांचा कॅमेरा त्याने पहूर येथे पाच हजारात विक्री केला होता.
‘सीसीटीव्ही’मुळे झाला निष्पन्न
शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, हेकॉ. विजयसिंग पाटील, प्रितम पाटील व रतन गीते यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या पथकाने शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अक्षय छाडेकर हा कॅमेरा चोरताना निष्पन्न झाला. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने या पथकाने पहूर, पाळधी व पाचोरा येथे त्याचा शोध घेतला. पाळधी गावाकडे येणाºया ट्रॅव्हल्स बसमध्ये चालकाच्या कॅबीनमध्येच तो बसलेला पोलिसांना आढळून आला. त्यांनी या बसचा पाठलाग करुन पाळधीजवळच त्याच्या मुसक्या आवळल्या.