आगीत लाखोचा चारा जळून खाक
By admin | Published: April 22, 2017 12:21 AM2017-04-22T00:21:12+5:302017-04-22T00:21:12+5:30
शिरूड : विजेच्या तारांच्या पडल्या ठिणग्या
अमळनेर : तालुक्यातील शिरुड येथे चाºयावर वीजतारांच्या ठिणग्या पडून लागलेल्या आगीत चारा जळून खाक झाला. यात शेतकºयाचे सुमारे एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
शिरुड येथील गुलाबराव मधुकर पाटील यांच्या शेतात बाजरी मका व ज्वारीचा सुमारे २५ ते ३० ट्रॅक्टर चाराकुट्टी करण्यासाठी जमा करून ठेवला होता. २१ रोजी दुपारी हवेमुळे खांब तुटून पडला. त्यात तारांचे घर्षण होऊन चाºयावर ठिणगी पडल्याने, आग लागली. आगीत चारा पूर्णपणे जळून खाक झाला. जंगलातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी अमळनेर येथून पाण्याचा बंब मागविला. तोपर्यंत २५ ते ३० ट्रॅक्टर चारा खाक झाला होता. आगीचा पंचनामा शिरुड तलाठी वाल्मीक पाटील यांनी केला.
या वेळी महावितरणचे सहायक अभियंता अंकुश सरोदे, सहायक अभियंता संकेत मालठाणे, वायरमन निवृत्ती पाटील, भानुदास पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली.
(वार्ताहर)