मतदार जनजागृतीसाठी ‘लघुचित्रपट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 05:08 PM2019-09-28T17:08:46+5:302019-09-28T18:20:21+5:30
शुभारंभ : मू.जे. महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव- केसीईच्या अमृत महोत्सवी वर्षानिम्मित मू.जे.च्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व जनसंवाद व पत्रकारिता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान करिता लघुचित्रपट निर्मिती करण्यात येत आहे. या लघुचित्रपटाचा निवडणुकीत जनजागृतीसाठी वापर केला जाणार आहे.
या लघुचित्रटाचा शुभारंभ शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर.राणे, जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख प्रा.संदीप केदार, केतकी सोनार यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आला. प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी लिखित सहा कथाविषय आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनी अपूर्वा वाणी लिखित पहिले मतदान या लघुचित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. या लघुचित्रपटाचे दिग्दर्शन अभय सोनवणे व सहदिग्दर्शन आकाश बाविस्कर हे करित आहेत़ तर चलचित्रीकरण संजय जुमनाके व यात सहभागी कलाकार राहुल पवार, सोहम वाणी, जितेंद्र शिंपी हे आहेत. मतदार जनजागृती अभियानाकरीता प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे व मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.