अमळनेरच्या वेशीवर मंत्री अनिल पाटील झाले नतमस्तक!
By संजय पाटील | Published: July 7, 2023 11:38 AM2023-07-07T11:38:10+5:302023-07-07T11:38:52+5:30
मंत्री अनिल पाटील यांचे ७ रोजी सकाळी रेल्वेने जळगाव येथे आगमन झाले.
अमळनेर (जि.जळगाव) : मंत्रिपद मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी प्रथमच अमळनेर येथे आलेले अनिल पाटील हे लोणे येथे गाववेशीजवळ पोहचतात भूमीवर डोके टेकवात नतमस्तक झाले.
मंत्री अनिल पाटील यांचे ७ रोजी सकाळी रेल्वेने जळगाव येथे आगमन झाले. अजिंठा विश्रामगृहात थोडा वेळ थांबून ते शासकीय वाहनांच्या ताफ्यासह अमळनेरकडे रवाना झाले. अमळनेर तालुक्याच्या हद्दीत पोहचताच ते वाहनातून खाली उतरले आणि डोके टेकवत अमळनेरच्या भूमीला वंदन केले. यावेळी ते भावनिक झाले होते.
अमळनेर मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील , माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे , माजी नगरसेवक मुन्ना शर्मा, लोणे सरपंच भाईदास भिल यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी स्वागत केले. त्यांनतर टाकरखेडा येथे त्यांनी सती मातेचे दर्शन घेतले.