जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या पाहणीसाठी मंत्री फिरकलेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:37 PM2018-10-15T22:37:20+5:302018-10-15T22:39:05+5:30
जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या पाहणीसाठी मंत्री फिरकलेलेच नाहीत. जे मंत्र्यांचे दौरे झाले ते कार्यक्रमांसाठीच झालेले असल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
जळगाव : मुख्यमंत्र्यांनी मंत्री, पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्यात जाऊन दुष्काळाची पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतील, अशी घोषणा केली असतानाही अद्यापही जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या पाहणीसाठी मंत्री फिरकलेलेच नाहीत. जे मंत्र्यांचे दौरे झाले ते कार्यक्रमांसाठीच झालेले असल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र गावोगावी, शेतांवर जाऊन पाहणी सुरू झाली असून त्याचा अहवाल १७ पर्यंत जिल्हाधिकाºयांकडे सादर केला जाणार आहे.
सप्टेंबर अखेर ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झालेले १२ तालुके दुष्काळाच्या पहिल्या निकषात (ट्रिगर) पात्र झाले आहेत, तर पारोळा, एरंडोल व धरणगाव हे तालुके अपात्र ठरले. मात्र दुसºया निकषात त्यात आणखी पारोळा तालुक्याचा समावेश झाला आहे. एकूण १३ तालुके गंभीर दुष्काळाच्या निकषात पात्र ठरले आहेत.
अनास्थेबाबत शेतकºयांमध्ये नाराजी
मुख्यमंत्र्यांनी जळगाव दौºयात दुष्काळाची परिस्थिती असल्याचे मान्य केले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यात सर्व मंत्री व पालकमंत्री फिरून दुष्काळाची पाहणी करतील, असेही जाहीर केले होते. मात्र अद्यापही कोणीही मंत्री दुष्काळाच्या पाहणीसाठी फिरकलेले नाहीत. जे मंत्री जिल्ह्यात आले ते काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आले. कार्यक्रम आटोपून रवाना झाले आहेत.