सहकार राज्यमंत्र्यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट
By Admin | Published: June 29, 2017 05:53 PM2017-06-29T17:53:38+5:302017-06-29T17:53:38+5:30
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली.
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.29- रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी जाऊन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. एक तासांच्या भेटीत निरूपनातून डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी राज्याच्या विकासासाठी जबाबदारी व कर्तव्याची जाणिव करून दिली.
केंद्र शासनातर्फे डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने सहकार राज्यमंत्र्यांनी त्यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. या भेटी दरम्यान स्वच्छता अभियान, वृक्ष संवर्धन, समाज प्रबोधन, अंधश्रद्धा या विषयांवर चर्चा झाली. यावेळी सचिन धर्माधिकारी, रायगडचे जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडका, माजी जि.प.सदस्य विश्वनाथ पाटील, अश्विनकुमार पोतदार उपस्थित हाते.