मागास समुदायातील अल्पवयीन मुलाला झाडाला बांधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 11:23 PM2021-06-08T23:23:58+5:302021-06-08T23:25:10+5:30

दलित समाजातील एका मुलाला शेतमालकसह सालदाराने झाडाला बांधून ठेवल्याची संतापजनक घटना अंजनविहीरे येथे तीन दिवसापुर्वी घडली आहे.

A minor from a backward community was tied to a tree | मागास समुदायातील अल्पवयीन मुलाला झाडाला बांधले

मागास समुदायातील अल्पवयीन मुलाला झाडाला बांधले

googlenewsNext
ठळक मुद्दे शेतमालकासह सालदाराने बांधल्याची अंजनविहीरेतील संतापजनक घटनादोन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

भडगाव : कैऱ्या तोडल्या म्हणून दलित समाजातील एका अल्पवयीन मुलाला शेतमालकसह सालदाराने झाडाला बांधून ठेवल्याची संतापजनक घटना तालुक्यातील अंजनविहीरे येथे तीन दिवसापुर्वी घडली आहे. विशेष म्हणजे झाडाला बांधल्याचा व्हीडीओ मोबाईलमध्ये काढून तो व्हाॅट्सअपवर व्हायरल केला. याबाबत पोलीस ठाण्यात शेतमालकासह सालदारावर गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

उल्हासनगर येथिल १७ वर्षीय दलीत युवक शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील अंजनविहीरे येथे मामाकडे आलेला होता. बारावी वर्गात शिक्षण घेणारा युवक तीन दिवसापुर्वी आपल्या आजीचे गुडघे दुखीचे औषधी घेण्यासाठी गिरड येथे गेला असता औषधी घेऊन अंजनविहीरे येथे घरी परत येत असताना रस्त्यात त्याने गोपी पाटील याच्या शेतातील झाडाच्या कैऱ्या तोडल्या. त्यावेळी सालदार प्रवीण पावरा याने त्याला जाब विचारत शेत मालक विवेक रविद्र पाटील ऊर्फ गोपी पाटील यांस फोन करून शेतात बोलावून घेतले.

नंतर दोघांनी मुलाला मारहाण करत दोराच्या सहाय्याने चिकूच्या झाडाला बांधले. यावेळी 'तो युवक शेत मालकास ‘मामा ! माझी चुक झाली, पुन्हा अस करणार नाही’, असे विनवणी करत होता. यावेळी गोपीने त्याचा व्हीडीओ मोबाईलमध्ये काढत तो व्हिडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल केला. तसेच पुन्हा कैऱ्या तोडायला आला तर हातपाय तोडण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित मुलाने घडलेला प्रकार आपले मामा व आजीला व इतर नातेवाईक यांना सांगितला. 

याबाबत दिनाक ६ जुन रोजी रात्री उशिरा भडगाव पोस्टेला दलित युवकाने दिलेल्या फिर्यादीवरुन भादंवि कलम ३४२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४, अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे ३ (१), सीआरएस व माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम २००८ चे ६६ सी प्रमाणे गुन्हा दाखल करुन विवेक रविद्र पाटील ऊर्फ गोपी पाटील, प्रवीण पावऱ्या यांना अटक झाली आहे. त्यांना जळगाव येथे विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास डीवायएसपी कैलास गावडे करीत आहेत.

Web Title: A minor from a backward community was tied to a tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.