जळगावात रिक्षा थेट मतदान केंद्रावर जात असल्याने किरकोळ वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 12:55 PM2019-10-21T12:55:44+5:302019-10-21T12:56:50+5:30

जळगाव : शहरातील का़ ऊ. कोल्हे विद्यालयातील मतदान केंद्रात ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी रिक्षा उपलब्ध करून देण्यात आहेत मात्र, गेट ...

Minor dispute as rickshaw goes straight to the polling station in Jalgaon | जळगावात रिक्षा थेट मतदान केंद्रावर जात असल्याने किरकोळ वाद

जळगावात रिक्षा थेट मतदान केंद्रावर जात असल्याने किरकोळ वाद

Next

जळगाव : शहरातील का़ ऊ. कोल्हे विद्यालयातील मतदान केंद्रात ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी रिक्षा उपलब्ध करून देण्यात आहेत मात्र, गेट पासून केंद्र लांब असल्याने या नागरिकांना या रिक्षा थेट मतदान केंद्रापर्यंत सोडत असल्याने पोलिसांनी एका रिक्षाला अडविल्याने काही काळ कार्यकर्ते व पोलिसांमध्ये शाब्दीक चकमक उडाली़ पोलिसांनी हटकल्यानंतर या ठिकाणी व्हील चेअर का नाही, असा सवाल उपस्थित करून नागरिकांनी संताप व्यक्त केला़ यावर हे आमचे काम नाही, मतदान केंद्रात सांगा असे पोलिसांनी उत्तर दिले़
नगरसेवकांच्या भेटी
अनेक मतदान केंद्रांवर नगरसेवक फिरून मतदानाचा आढावा घेताना दिसून येत आहे़ मतदान झाले का अशी विचारणा करण्यासह कार्यकर्त्यांडून मतदाराना नाव शोधण्यात सहकार्य होतानाचे चित्र आहे़

Web Title: Minor dispute as rickshaw goes straight to the polling station in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव