वनरक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:12 AM2021-07-16T04:12:41+5:302021-07-16T04:12:41+5:30
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या लगडाआंबा पाड्यावरील पीडित १३ वर्षीय बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास यावल वन्यजीव ...
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या लगडाआंबा पाड्यावरील पीडित १३ वर्षीय बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास यावल वन्यजीव विभागाच्या वनरक्षकाने घरात येऊन १३ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलगी व तिच्या दोन लहान बहिणी यावेळी घरात होत्या, तर आई – वडील बाहेरगावी गेले होते. तेव्हा हा वनरक्षक घरात पाणी पिण्याच्या बहाण्याने आला असता, पीडितेच्या ६ वर्षीय लहान बहिणीने पाणी आणले असता, तू २० रुपये घे व हातपंपावरून ताजे पाणी आण, असे सांगितले. तसेच दुसऱ्या लहान बहिणीला २० रुपये दिले व तू बिस्किट आण असे सांगून घराबाहेर पाठविले. यानंतर १३ वर्षीय मुलीसोबत त्याने गलट करीत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. हा प्रकार पीडित मुलीने सायंकाळी आई, वडिलांना सांगितला व बुधवारी संबंधीत वनरक्षकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज घेण्यात आला आहे. चौकशीनंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी सांगितले.