गौण खनिज अपहार प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:27 AM2021-02-06T04:27:51+5:302021-02-06T04:27:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेच्या पाझर तलावातील गौण खनिजाची रॉयल्टी, वाहतुकीचे बनावट परवाने शिक्क यांच्या तक्रारीवरून आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या पाझर तलावातील गौण खनिजाची रॉयल्टी, वाहतुकीचे बनावट परवाने शिक्क यांच्या तक्रारीवरून आता याबाबत चौकशी करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी आर्थिक गुन्हे शाखेला पत्र दिले असून पोलीस अधिकाऱ्यांना जि.प.च्या अधिकाऱ्यांची याबाबत भेट घेतल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या पाझर तलावातील गौण खनिजाच्या रॉयल्टीत मोठा अपहार झाल्याचा आरोप सदस्या पल्लवी सावकारे यांनी केला असून त्यांनी याबाबत पोलीस अधीक्षकांकडेही तक्रार दिली आहे. हा अपहार कोट्यवधींचा असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश देऊनी कारवाई होत नसल्याचे पल्लवी सावकारे यांनी तक्रारीत म्हटले होते व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. लघुसिंचन विभागाकडून माहिती उपलब्ध होत नसल्याने त्यांनी यावर प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी आर्थिक गुन्हे शाखेला याबाबत पत्र दिले आहे. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी जि.प. सीईओ आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. मात्र, जि.प. अंतर्गत विभागीय चौकशी पूर्ण नसल्याने यात कारवाई होत नसून ही चौकशी पूर्ण होऊन जबाबदारी निश्चित झाल्यानंतर पुढील कारवाई होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.