गौण खनिज महिला अधिका:याचा दुर्गावतार

By admin | Published: May 20, 2017 12:45 AM2017-05-20T00:45:48+5:302017-05-20T00:45:48+5:30

रावेर : निंभोरासीम तापी नदीपात्रात सकाळीच पोलीस बंदोबस्तात धडकल्याने खळबळ

Minor Mineral Women's Officer: Durgavtar | गौण खनिज महिला अधिका:याचा दुर्गावतार

गौण खनिज महिला अधिका:याचा दुर्गावतार

Next

रावेर : तालुक्यातील निंभोरासीम, दोधे व अटवाडे येथे तापी नदीपात्रातील वाळूचे ठेके घेऊनही विनापरवाना वाळूची सर्रास अवैध वाहतूक होत असल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने आज सकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास थेट जिल्हा गौण खनिज अधिकारी नीलिमा जाधव यांनी रुद्रावतार दाखवत  निंभोरासीम येथील तापी नदीपात्रातील अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर धडक कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.                    एखादी  महिला तलाठी समजून अवैध वाळूवाहतूक करणा:या  ट्रॅक्टरचालकांनी त्यांना प्रारंभी गुंगारा  देण्याचा प्रय} केला.
मात्र त्यांचे वाहन पोलीस बंदोबस्त पाहून अवैध गौण खनिज वाहतूकदारांनी शरण येत त्यांचा दंडात्मक कारवाईचा दंडुका मान्य करून तीन ट्रॅक्टरमालकांनी 27 हजार रुपये दंडाची रक्कम आज जमा केली.   तहसीलदार विजयकुमार ढगे यांच्याकडून कारवाईचा दंडुका सुरू असला तरी थेट जळगावहून जिल्हा गौणखनिज अधिकारी नीलिमा जाधव यांनी थेट धडक कारवाई केल्याने स्थानिक महसूल कर्मचारी व अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
 तालुक्यातील तापी नदीपात्रात अटवाडे, दोधे व निंभोरासीम येथील वाळूचा लिलाव झाला असला तरी, लिलावात नमूद केलेल्या वाळूसाठय़ा पलीकडे कित्येक पटीने वाळू तापी नदीपात्रातून ओरबाडून नेण्यासाठी विनापरवाना पावतीखेरीज दररोज रात्री वा भल्या पहाटे अनेक वाहने अवैध गौण खनिज वाहतूक करीत असल्याचे  जिल्हा प्रशासनास दिसून आले.  त्या अनुषंगाने जिल्हा गौण खनिज अधिकारी  नीलिमा जाधव यांनी आज दोन अंगरक्षकांच्या पोलीस बंदोबस्तात आपला मोर्चा थेट  तालुक्यातील तापी नदीपात्रात वळविला. निंभोरासीम येथील तापी नदीपात्र गाठून त्यांना विनापरवाना वाळू वाहतूक करणारी तीन ट्रॅक्टर आढळून आले.
संबंधित ट्रॅक्टरचालकांनी महिला तलाठी समजून त्यांना गुंगारा देण्याचा प्रय} केला.
मात्र  अंगरक्षक असलेले पोलीस व कारकुनाने  ओळख दाखवताच चालक व मालकांत भंबेरी उडाली. थेट जिल्हा गौण खनिज अधिकारी नीलिमा जाधव या स्वत:च थेट तापी पात्रात दाखल झाल्याने त्यांनी दंडात्मक कारवाईला सकारात्मक प्रतिसाद दिला.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या पडणा:या आकस्मिक धाडींमुळे वाळूची अवैध गौण खनिज वाहतूक करणा:यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Minor Mineral Women's Officer: Durgavtar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.