मुक्ताईनगर तालुक्यातील दुचाकी चोरीतील अल्पवयीन संशयित ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 07:52 PM2018-10-27T19:52:59+5:302018-10-27T19:53:41+5:30
कुºहा परिसरातील जोंधनखेडा येथील एक व मलकापूर तालुक्यातून चोरी गेलेल्या सहा अशा एकूण सात मोटारसायकली कुºहा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या चोरीप्रकरणी येथून जवळच असलेल्या धामणगाव येथील एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे.
कुºहा काकोडा, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : कुºहा परिसरातील जोंधनखेडा येथील एक व मलकापूर तालुक्यातून चोरी गेलेल्या सहा अशा एकूण सात मोटारसायकली कुºहा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या चोरीप्रकरणी येथून जवळच असलेल्या धामणगाव येथील एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे.
जोनधनखेडा, ता.मुक्ताईनगर येथील अजय अर्जुन साळुंके यांनी फिर्याद दिली होती. चिखली, ता.मुक्ताईनगर येथील एका ढाब्यावरून त्यांची मोटारसायकल (एमएच-२८-वाय-०२९५) २४ आॅक्टोबर रोजी चोरीस गेली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर कुºहा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार सुधाकर शेजोळे, शिपाई सुरेश पवार, भगवान पाटील, अनिल सोननी, मेजर कातरे, नीलेश श्रीनाथ यांनी या प्रकरणाचा तपास केला असता चोरीत धामणगाव येथील एका अल्पवयीन तरुणाचा सहभाग असल्याची त्यांना शंका आली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता सदर मोटारसायकल चोरल्याचे त्याने मान्य केले. तसेच अधिक चौकशी केली असता त्याने आणखी सहा मोटारसायकली चोरल्याचे सांगितले. एकूण सात मोटारसायकली पैकी एक मोटारसायकल चिखली येथून तर उरलेल्या सहा मोटारसायकली त्याने मलकापूर रेल्वे स्थानकावरून चोरल्याचे कबूल केले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून सर्व मोटारसायकली जप्त केल्या. याबाबत मुक्ताईनगर पोलिसात त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास कुºहा चौकीचे हवालदार सुधाकर शेजोळे करीत आहेत.