वरिष्ठ लिपिकाने हाताळली अल्पसंख्यांक आयोगाची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:09 AM2019-02-14T11:09:18+5:302019-02-14T11:09:45+5:30
अनेक विभागाच्या अधिकाºयांना माहितीसाठी काढले बाहेर
जळगाव : राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, १३ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाºयांसह विविध विभागांच्या अधिकाºयांची बैठक अध्यक्षांसोबत आलेल्या अल्पसंख्यांक आयोगाच्या मुंबई कार्यालयातील वरिष्ठ लिपिकानेच हाताळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अध्यक्षांनी मात्र आढावा आटोपल्यावर अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या सोडविण्याचे आवाहन करीत समारोप केला.
राज्याचे अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वीच पदभार घेतला असून अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या, प्रश्न समजावेत, ते सोडविण्यासाठी प्रयत्न करता यावेत, यासाठी राज्याच्या दौºयावर निघाले असून आतापर्यंत २६ जिल्ह्यांचा दौरा करून बुधवार, १३ फेब्रुवारी रोजी ते जळगाव दौºयावर आले होते. सकाळी त्यांनी विश्रामगृहावर जैन, शिख, बौद्ध व मुस्लीम या अल्पसंख्यांक समाजाच्या शिष्टमंडळांशी चर्चा करून दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक/निरंतर), सेवायोजन अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, लिड बँक मॅनेजर, जिल्हा वक्फ अधिकारी, जिल्हा व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ व इतर सर्व संबंधित अधिकारी यांच्या सोबत पंतप्रधानाचा पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती.
या बैठकीस पोलीसांचा प्रतिनिधी नव्हता. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारीही नव्हते. मात्र जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्यासह शिक्षण व इतर विभागांचे अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिकाºयांना माहिती घेण्यासाठी हॉलबाहेर काढले
शिक्षणाधिकारी निरंतर, तसेच उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे सुरवसे यांनी विचारलेल्या मुद्यांची माहिती नसल्याने त्यांना आधी जिल्हाधिकाºयांनी झापले. तर सुरवसे यांनी या अधिकाºयांना बाहेर जाऊन फोनवरून माहिती घ्या, मग येऊन सांगा, असे सुनावत बाहेरचा रस्ता दाखविला.
अन् वरिष्ठ लिपिकाने घेतला बैठकीचा ताबा
दुपारी तीन वाजेच्या सुमारास आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांचे बैठकस्थळी आगमन झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या मुंबई कार्यालयातील वरिष्ठ लिपिक गणेश सुरवसे तसेच स्वीय सहायक व इतर काही मंडळी होती. तसेच स्थानिक काही कार्यकर्तेही या बैठकीच्या हॉलमध्ये शिरले होते. या सगळ्यांच्या उपस्थितीतच बैठकीला सुरूवात झाली. अध्यक्षांच्या एका बाजूला जिल्हाधिकारी तर दुसºया बाजूला वरिष्ठ लिपिक सुरवसे बसले होते. अध्यक्षांच्यावतीने सुरवसे यांनीच बैठकीस सुरूवात करीत विभागनिहाय अधिकाºयांकडून आढावा घेतला.
सुरवसे यांनी पद सांगणे टाळले
बैठकीत आढावा घेणारे सुरवसे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी आयोगाच्या अध्यक्षांनीच आढावा घेतला. माझे नाव बातमीत घेऊ नका, असे सांगितले. त्यांना तुमचे पद वरिष्ठ लिपिक आहे का? अशी विचारणा केली असता त्यापेक्षा मोठे पद असल्याचे सांगत फोन कट केला.
आढावा आयोगाच्या अध्यक्षांनीच घेतला. त्यांना कोणीही त्यासाठी सहकार्य करू शकतो. त्यामुळे वरिष्ठ लिपिकाने आढावा घेतला, असे म्हणता येणार नाही. त्यांना फक्त विचारलेली माहिती दिली. सोलापूरला देखील आढाव्यासाठी अध्यक्षांसोबत हेच आले होते. -अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी.
आयोगाच्या अध्यक्षांनीच आढावा घेतला. तसेच माझे पद वरिष्ठ लिपिकापेक्षा मोठे आहे. -गणेश सुरवसे.