रस्त्याची दयनीय अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:15 AM2021-03-06T04:15:34+5:302021-03-06T04:15:34+5:30
केंद्र बंद केल्याने गोंधळ जळगाव : शहरातील लसीकरणाचे दोन केंद्र अचानक बंद करण्यात आल्याने, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल ...
केंद्र बंद केल्याने गोंधळ
जळगाव : शहरातील लसीकरणाचे दोन केंद्र अचानक बंद करण्यात आल्याने, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल होते. वृद्ध आणि अन्य व्याधी असलेल्यांचे लसीकरण सुरू झाले असले, तरी केंद्राबाबत स्पष्टीकरण नसल्याने पहिल्या दिवशी नागरिकांचा गोंधळ उडाला होता.
गर्दी वाढली
जळगाव : कोरोना चाचण्या करण्यासाठी आता शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र आहे. दिवसाला सरासरी पाचशे चाचण्या होत असून, शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ समोर येत असल्याने, आता लोक समोर येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जि.प.त काळजी गरजेची
जळगाव : जिल्हा परिषदेत कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर आता काही उपाययोजना राबविल्या जात आहेत. मात्र, त्यात सातत्य असणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. ग्रामपंचायत विभागात दोन फलक लावण्यात आले आहेत, तर छोट्या गेटवरून जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी व्हावी, यासाठी कर्मचारी नियुक्त आहेत. मात्र, प्रत्येकाची तपासणी होत नसल्याचे चित्र आहे.