जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयात विद्याथ्र्याचा संशोधनात्मक ‘आविष्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:15 PM2017-12-22T14:15:55+5:302017-12-22T14:20:07+5:30

1 हजार 32 जणांचा सहभाग

MJ in Jalgaon Research student 'invention' in college | जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयात विद्याथ्र्याचा संशोधनात्मक ‘आविष्कार’

जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयात विद्याथ्र्याचा संशोधनात्मक ‘आविष्कार’

Next
ठळक मुद्दे वीज निर्मिती, बचत, स्मार्ट सिटी, सांडपाण्याच्या प्रश्नांवर प्रकाशझोतविविध विषयांवरील पोस्टर व मॉडेल

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 22- कमी खर्चात वीज निर्मिती करण्यासह विजेची वाढती मागणी व त्यादृष्टीने तिची बचत, स्मार्ट सिटी उभारणे तसेच सांडपाण्याचा पुनर्वापर करीत जमिनीची पाणी पातळी वाढविणे यासह वेगवेगळ्य़ा प्रयोग सादरीकरणातून विद्याथ्र्याच्या संशोधनात्मक बुद्धीचा ‘आविष्कार’ मू.जे. महाविद्यालयात दिसून येत आहे. 
पहिल्या टप्प्यात जिल्हा पातळीवरील आविष्कार संशोधन स्पर्धा गुरुवारी मू.जे. महाविद्यालयात झाली. त्याचे उद्घाटन इतिहासकार आणि लेखक प्रा.डॉ. सच्चीदानंद शेवडे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी होते तर प्रमुख पाहुणे  विद्यापीठाचे आविष्कार संशोधन स्पर्धाचे सह समन्वयक डॉ.सुनील कुलकर्णी, स्पर्धेचे निरीक्षक डॉ. आर.एल. शिंदे यांच्यासह मू.जे. महाविद्यालयाचे स्पर्धेचे समन्वयक डॉ.एम.ङोड. चोपडा व तिन्ही शाखेचे उपप्राचार्य डॉ.सुरेश तायडे, डॉ. अनिल सरोदे, डॉ. देवयांनी बेंडाळे, उमविचे वित्त व लेखाधिकारी डॉ.बी.डी.क:हाड उपस्थित होते.

विविध विषयांवरील पोस्टर व मॉडेल
या अविष्कार स्पर्धेत सामाजिकशास्त्र, भाषा, ललित कला विद्याशाखेचे 135, वाणिज्य व्यवस्थापन, विधी विद्याशाखेचे 83, प्यूअर विज्ञान विद्याशाखेचे 221, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेचे 53, वैद्यकीय आणि औषधनिर्माणशास्त्र विद्याशाखेचे 30, कृषी आणि प्राणीशास्त्र विद्याशाखेचे 46 असे एकूण 568 पोस्टर व मॉडेल सादर झाले. शिक्षक व विद्यार्थी मिळून 1 हजार 32 जणांनी सहभाग घेतला.


संशोधनात युवा वर्गाचे अधिक योगदान 
या वेळी बोलताना प्रा.डॉ. सच्चीदानंद शेवडे म्हणाले की, संशोधनामुळे देशाचे नाव जगभरात अग्रेसर असून त्यात युवा वर्गाचे योगदान अधिक आहे. त्यामुळे आजच्या अविष्कारमधून शेकडो विद्यार्थी संशोधक म्हणून पुढे येत नक्की चांगले व गुणवंत शास्त्रज्ञ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

विद्याथ्र्यांनी आत्महत्या करू नये 
डॉ. शेवडे पुढे म्हणाले की, कोणाचेही म्हणणे आधी व्यवस्थित ऐका आणि मग तुमचे म्हणणे मांडा.  आपल्यातील सामथ्र्य ओळखून स्वत:च्या बुद्धीचा वापर करा. प्रश्न पडण्याची सवय लागली की आपण संशोधनाकडे वळतो. 2005 ते 2015 या दशकात पावणे दोन लाख एवढे युवक आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचा दाखला देत  विविध किरकोळ कारणांसाठी विद्याथ्र्यांनी आत्महत्या करू नये असे आवाहन केले.

विषय निवडीतून कल्पक बुद्धीचे दर्शन
विद्याथ्र्यांची विविध विषयांमध्ये असणारी आवड व त्यातून संशोधन करावेसे वाटण्याचा विषय निवडणे यातून त्यांची कल्पक बुद्धी दिसून येते, असे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी मनोगतातून सांगत स्पर्धेतून त्यांचे संशोधन गुण दिसून येतात, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.भाग्यश्री भलवतकर यांनी केले. 

विद्यापीठस्तरीय स्पर्धा 29 व 30 रोजी
विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा 29 व 30 डिसेंबर रोजी आहे. त्यानंतर त्यातील विजेते 15 ते 18 जानेवारी दरम्यान राहुरी कृषी विद्यापीठ येथे तर पुढील विजेते हे फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय आविष्कार स्पर्धेत सहभागी होतील, अशी माहिती विद्यापीठ समन्वयकांनी दिली.

विद्यापीठात विज्ञान, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, कृषी विषयावर सादरीकरण

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 177 प्रवेशिकाद्वारे 288 विद्याथ्र्यांनी पोस्टर व मॉडेल्सद्वारे आपले सादरीकरण केले. पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी आणि शिक्षक अशा चार गटात झालेल्या आविष्कार संशोधन स्पर्धेत विद्याथ्र्यांनी पोस्टर व मॉडेल्सद्वारे नाविण्यपूर्ण संशोधन सादर केले. विज्ञान, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन, कृषी असे विविध विषय विद्याथ्र्यांनी हाताळले.
या स्पर्धेचे उद्घाटन इंदूर येथील भौतिकशास्त्राचे प्रा.डी.एम. फासे यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. तर प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांची मुख्य उपस्थिती होती. मंचावर प्रमुख समन्वयक डॉ.जितेंद्र नाईक, डॉ.भूषण चौधरी उपस्थित होते. 

संशोधनात शिक्षकांनी पुढाकार घ्यावा
शिक्षक आणि संशोधन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून शिक्षकांमुळेच विद्यार्थी संशोधनात रस घेत असतात. त्यामुळे शिक्षकांनी संशोधन करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रा.डी.एम. फासे यांनी केले. 12 वषार्पूर्वी सुरु केलेल्या आविष्कार स्पर्धेचे आता वटवृक्षात रुपांतर झाले असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.  या स्पर्धेमुळे विद्याथ्र्यांना नाविन्यपूर्ण संशोधनाची गोडी निर्माण होऊ लागली आहे. या नवीन कल्पनांचे रुपांतर पुढे उत्पादकता  करण्यात झाले पाहिजे.  भारतात गुणवत्ता असली तरी अनुकरण करण्याची मानसिकता अधिक असल्यामुळे नवे काही घडत नाही. संशोधनात शोधनिबंध प्रकाशित करण्यात प्राध्यापकांना रस असून पेटंट दाखल करण्यात रस घेतला जात नाही असेही ते म्हणाले.

विद्याथ्र्यामध्ये आत्मविश्वास वाढला
 प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर म्हणाले की, आविष्कार संशोधन स्पर्धेत राज्यपातळीवर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने चांगली कामगिरी करुन आपले वेगळेपण सिध्द केले आहे.  त्यामुळे विद्याथ्र्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. भविष्यात राज्यपातळीवर विद्यापीठाचे विद्यार्थी पहिला क्रमांक प्राप्त करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संशोधन सिध्द करण्याची संधी  
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील म्हणाले की, आविष्कार स्पर्धा ही विद्याथ्र्यांना आपले संशोधन सिध्द करण्याची संधी आहे. प्रयोगशाळा अथवा ग्रंथालय या पूरते संशोधन मर्यादीत न राहता समाजार्पयत ते जाण्याची गरज आहे. प्रारंभी प्रा.भूषण चौधरी यांनी प्रास्ताविक केले.
सूत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी यांनी केले. डॉ.डी.एस.दलाल यांनी आभार मानले. 

Web Title: MJ in Jalgaon Research student 'invention' in college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.