आमदार किशोर पाटील यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 18:04 IST2020-08-28T18:01:08+5:302020-08-28T18:04:31+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या आठवड्यात आमदार किशोर पाटील हे कोरोना बाधित झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार आहेत. त्यानंतर आता सुनिता पाटील यांनाही मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आमदार किशोर पाटील यांच्या पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह
पाचोरा (जि. जळगाव) - आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी व पाचोरा शहराच्या माजी नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात आमदार किशोर पाटील हे कोरोना बाधित झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार आहेत. त्यानंतर आता सुनिता पाटील यांनाही मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दोघांची प्रकृती ठीक असून कोणताही धोका नसल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
"कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा दबाव", आरोग्यमंत्र्यांचा आरोप
देशात 1 सप्टेंबरपासून सर्वांचं वीज बिल माफ होणार?, जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य
"आमच्यावर हल्ला कराल तर..."; छोट्याशा शेजारी देशाचा चीनला थेट इशारा
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! अचानक लोक झाले गायब, 'या' गावातील 90 टक्के घरांना टाळं
"मुंबई पोलीस आयुक्तांना निलंबित करा", भाजपा आमदाराचं थेट मोदींना पत्र