आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांची नाशिक कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:16 AM2021-03-31T04:16:48+5:302021-03-31T04:16:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना दोरीने बांधून ठेवल्याच्या प्रकरणात आमदार मंगेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना दोरीने बांधून ठेवल्याच्या प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, जळगाव कारागृहात जागा नसल्याने नाशिक कारागृहात पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
महावितरण कंपनीने चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेले आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना घेऊन अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांच्या कार्यालयात धडक देऊन शेख यांना दोरीने बांधले होते. २६ मार्च रोजी ही घटना घडली होती. त्याच दिवशी आमदारांसह शेतकऱ्यांना अटक झाली होती. तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर तपासाधिकारी प्रताप शिकारे यांनी सर्व संशयितांना पोलीस ठाण्यातूच व्हिडिओ काॅलिंगवरून हजर केले. पोलिसांनीच न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. जिल्हा पेठ, जळगाव शहर एमआयडीसी अशा तीन ठिकाणच्या पोलीस ठाण्याच्या कोठडीत संशयितांना ठेवण्यात आले होते. सायंकाळी दोन वाहनातून सर्वांना नाशिकला नेण्यात आले.
असे आहेत संशयित आरोपी
आमदार मंगेश साहेबराव चव्हाण (३९, रा. चाळीसगाव) परमेश्वर फकिरा रावते (३९ रा. खेडी बुद्रुक), चांगदेव तुळशीराम राठोड (६०,रा.वलठाण), देवीदास पंडित पाटील (५१, बोरखेडे पिराचे), अमोल उत्तमराव पाटील (३२, रा.पिलखोड), शांताराम रामचंद्र पाटील(३६ पिलखोड), बळीराम पिरा यशोद (४०,रा.पिलखोड), राजेंद्र नगराज पाटील (३९ बोरखेडा), अरुण भिला पाटील (३७, रा. बोरखेडा), भास्कर लखा पाटील (६५, पिंप्री), प्रवीण गणेशराव पाटील (५०, रा. तळोंदा), सचिन वाल्मीक पाटील (३५, रा.पिंप्री), कैलास वामन पाटील (३५, पिंप्री), गोरख सुदाम पाटील (३८, पिंप्री), बदामराव श्रावण पाटील (६०, रा. तळोंदा), अनिल शिवराम पाटील (४०, रा.पिंप्री), अशोक पुंडलिक पाटील (५५, रा.खर्डे), उत्तम भिवसन पाटील (४५), विनोद परशुराम पाटील (४०, रा.खर्डे), चेतन रवींद्र पाटील (२६, रा.नांद्रे), दिनेश नाना महाजन (३५, रा. सायगाव), गोरख मोहन पगारे (२३, रा. पिंप्री), संजय रतनसिंग पाटील (५५, रा. जामदा), सश्चिदानंद नीळकंठ चव्हाण (३७, रा. हिंगोणे), संजय भास्कर पाटील (५०, रा. पातोंडा), सुभाष नानाभाऊ पाटील (५३, भामरे), देवगण पितांबर सोनवणे (२८, रा.पातोंडा), धनंजय सुखदेव पाटील (४९), रजनीकांत वसंत पाटील (३०), सचिन गुलाब पवार (२३) व दत्तात्रय रवींद्र विसपुते (३९, रा.खडकी बु.) यांचा समावेश आहे.