आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांची नाशिक कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:16 AM2021-03-31T04:16:59+5:302021-03-31T04:16:59+5:30
अभियंत्याला बांधल्याचे प्रकरण : न्यायालयीन कोठडी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारूख शेख यांना ...
अभियंत्याला बांधल्याचे प्रकरण : न्यायालयीन कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारूख शेख यांना दोरीने बांधून ठेवल्याच्या प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, जळगाव कारागृहात जागा नसल्याने नाशिक कारागृहात पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना घेऊन अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांच्या कार्यालयात धडक देऊन शेख यांना दोरीने बांधले होते. २६ मार्चला ही घटना घडली होती. त्याच दिवशी आमदारांसह शेतकऱ्यांना अटक झाली होती. तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर तपासाधिकारी प्रताप शिकारे यांनी सर्व संशयितांना पोलीस ठाण्यातूच व्हिडिओ काॅलिंगवरून हजर केले. पोलिसांनीच न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.