आमदार मंगेश चव्हाण यांचा जिल्हा कारागृहातच मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:14 AM2021-04-05T04:14:50+5:302021-04-05T04:14:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना दोरीने बांधून ठेवल्याप्रकरणात चाळीसगावचे आमदार मंगेश ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना दोरीने बांधून ठेवल्याप्रकरणात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जण अद्यापही जळगाव कारागृहात आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात निर्णय होणार आहे.
या गुन्ह्यातील सर्व संशयिताच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, ३० मार्च रोजी न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आमदार चव्हाण यांच्यासह सर्व ३१ जणांना नाशिक कारागृहात हलविण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, काही कारणास्तव आमदार चव्हाण यांना जिल्हा कारागृहातच ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आमदार चव्हाण यांच्यासह सर्व संशयितांच्या जामीन अर्जावर न्यायाधीश छाया पाटील यांच्या न्यायालयात दोन्ही पक्षांचे युक्तिवाद १ एप्रिल रोजी पुर्ण झाले आहेत. त्यावर आज ५ एप्रिल रोजी न्यायालय निकाल देणार आहे.