आमदार सावकारे यांनी कुºहे (पानाचे) येथे केले श्रमदानातून नाल्यांचे खोलीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 04:48 PM2019-05-19T16:48:03+5:302019-05-19T16:49:08+5:30
आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे नाला खोलीकरण व सिमेंट बंधाऱ्यातील गाळ उपसण्याचे काम श्रमदानातून १९ मे रोजी करण्यात आले.
भुसावळ, जि.जळगाव : आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे नाला खोलीकरण व सिमेंट बंधाऱ्यातील गाळ उपसण्याचे काम श्रमदानातून १९ मे रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समाधान पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, सरपंच रामलाल बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य नारायण कोळी यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही वषार्पासून पावसाचे प्रमाण अतिशय कमी होत आहे. त्यात नदी-नाल्यांमध्ये गाळ साचला आहे. त्यामुळे पाऊस पडला तरी हे पाणी वाहून जात असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. जमिनीतील पाणी पातळी टिकून रहावी यासाठी आमदारांनी तालुक्यातील कुºहे (पानाचे), चोरवड येथे नाला खोलीकरण करणे व सिमेंट बंधाºयातील गाळ उपसून पाणी जमिनीत जिरविण्यासाठी श्रमदानातून खोलीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आमदार सावकारे यांच्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. कुºहे पानाचे येथे रविवारी आमदार सावकारे यांनी रखरखत्या उन्हात उभे राहून परिसरातील दोन नाल्यांवर खोलीकरण करण्यासाठी उपस्थित राहिले व त्यांनी श्रमदानातून मोठ्या प्रमाणात हे काम करून घेतले.
या श्रमदानाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे या कुºहे (पानाचे) येथे सकाळी सात वाजताच बोदवड रोडवरील नाल्यावरील बांधावर उपस्थित झाल्या. स्वत: हातात टोपली घेऊन आमदारांनी प्रारंभ केला. त्यानंतर या श्रमदानामध्ये उपसरपंच वासू वराडे, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण नागपुरे, प्रमोद उंबरकर, सुरेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ.रमाकांत पाटील, बापू पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुनंदाबाई वराडे, कल्पना पाटील , अन्नपूर्णा पारधे, कोकिळाबाई पाटील, अनिल कुंभार, संजय पवार, धनराज पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले .
मोंढाळा रोडवरील नाल्याप्रमाणेच गावापासून जाणारा तेलखोरा पाझर तलावाच्या नाल्यात श्रमदानातून नाला खोलीकरण, सिमेंट बंधाºयातील गाळ उपसण्याचे काम करण्यात आले. या कामामुळे यावर्षी पावसाळा चांगला झाल्यास नाला व बंधाºयामध्ये पाणी साचून जमिनीत झिरपून त्याचा काही प्रमाणात ग्रामस्थांना फायदा होऊ शकतो.
दरम्यान, शनिवारी आमदार सावकारे यांनी शहरातील सांस्कृतिक फाउंडेशनच्यावतीने चोरवड नाला खोलीकरण उपक्रमात सहभाग घेतला व श्रमदान केले. दुसºयाच दिवशी रविवारी कुºहे (पानाचे) येथे हा उपक्रम राबवून त्यांनी सहभाग घेतला.
दिवसेदिवस जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. त्याचप्रमाणे हिरवेगार वृक्षही सुकू लागले आहेत. वृक्षांची संख्या कमी होत असल्यामुळे त्याचा परिणाम निसर्गावर झाला आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून वृक्षारोपण करणे व नाला खोलीकरण सिमेंट बंधाºयातील गाळ काढून जमिनीत पाणी जिरवणे आदी उपक्रम हाती घेणे गरजेचे असल्याचे मत आमदार सावकारे यांनी व्यक्त केले.