जळगावात आमदार सुरेश भोळे यांनी घेतली सुरेशदादा जैन यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:26 PM2018-08-14T12:26:20+5:302018-08-14T12:28:11+5:30

विविध प्रश्न व विकासाबाबत चर्चा

MLA Suresh Bhole meeting with Sureshdada Jain | जळगावात आमदार सुरेश भोळे यांनी घेतली सुरेशदादा जैन यांची भेट

जळगावात आमदार सुरेश भोळे यांनी घेतली सुरेशदादा जैन यांची भेट

Next
ठळक मुद्देशहर विकासाचे ५० वर्षांचे नियोजन करण्याचा सल्लाशहराचा विकास व्हावा ही सर्वांचीच इच्छा

जळगाव : शहरातील विविध प्रश्न व विकासाच्या नियोजनाबाबत आमदार सुरेश भोळे यांनी सोमवारी दुपारी ७, शिवाजीनगर येथे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची सदिच्छा भेट घेतली. शहराच्या विकासासाठी शिवसेना भाजपासोबत राहिल, अशी ग्वाही सुरेशदादा यांनी आमदार भोळे यांना दिली. शहराच्या विकासाचे ५० वर्षांचे नियोजन करा, असा सल्लाही सुरेशदादा यांनी भोळे यांना दिला.
यावेळी माजी नगरसेवक अमर जैन, जितेंद्र मुंदडा, प्रमोद नाईक, अमोल सांगोरे, बाबुशेठ श्रीश्रीमाळ आदी उपस्थित होते. यावेळी आमदार भोळे यांनी सुरेशदादांचे आशिर्वाद घेतले.
हुडको कर्जफेड, गाळेप्रश्नी केली चर्चा
आमदार भोळे यांनी हुडको कर्जफेड व गाळेप्रश्नी सुरेशदादा यांच्याशी चर्चा केली. हुडकोच्या कर्जाबाबत भोळे यांनी सांगितले की, हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे. तसेच शहरात अमृत योजनेतंर्गत सुरु असलेल्या कामांची माहितीही त्यांनी सुरेशदादा यांना दिली.
मार्गदर्शनासाठी मी २४ तास उपलब्ध... शहराच्या कोणत्याही समस्येबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मी २४ तास उपलब्ध असून, शहराचे प्रश्न मार्गी लागणे आवश्यक असल्याचे मत सुरेशदादा यांनी यावेळी व्यक्त केले. शहर विकासाबाबत केव्हाही गरज वाटेल तेव्हा भेट घ्या असेही सुरेशदादा, भोळेंना म्हणाले.
शहराचा विकास व्हावा ही सर्वांचीच इच्छा
सुरेश भोळे यांनी आगामी काळात शहरातील कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे याबाबतची चर्चा सुरेशदादांशी केली. त्यावर सुरेशदादा जैन यांनी सांगितले की, आगामी ५० वर्षांच्या विकासाचे नियोजन आखणे गरजेचे असून, तेव्हाच शहरातील प्रश्न मार्गी लागतील व विकास होईल. शहराचा विकास करण्याची इच्छा सर्वांचीच असून, सर्वांनी एकत्र यावे असे सुरेशदादांनी सांगितले.

आमदार सुरेश भोळे यांनी सदिच्छा भेट घेतली. शहर विकासासाठी सहकार्य करण्याबाबत चर्चा केली. विधायक कामांसाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत.
-सुरेशदादा जैन, माजी मंत्री

शहर विकासाच्या दृष्टीने सोमवारी सुरेशदादा जैन यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. शहरातील काही प्रलंबित प्रश्न तसेच विकासाचे नियोजनाबाबत सुरेशदादांचे मार्गदर्शन घेतले. त्यांच्यासह काही उद्योजक, समाजिक संस्थाच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा करण्यात आली आहे. शहराच्या विकासात सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. -सुरेश भोळे, आमदार

Web Title: MLA Suresh Bhole meeting with Sureshdada Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.