पाचोरा येथे आमदारांनी वाळूसाठी दंड थोपटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:38 AM2019-01-07T00:38:22+5:302019-01-07T00:39:50+5:30

वाळूअभावी शासकीय बांधकामे रखडली असून, आमदार किशोर पाटील यांनी प्रशासनाविरुद्ध दंड थोपटले आहे.

MLAs at Pachora threw sand for sand | पाचोरा येथे आमदारांनी वाळूसाठी दंड थोपटले

पाचोरा येथे आमदारांनी वाळूसाठी दंड थोपटले

Next
ठळक मुद्देवाळूअभावी शासकीय बांधकामे रखडलीआता प्रशासनाच्या भूमिकेकडे लागलेल लक्ष







पाचोरा, जि.जळगाव : वाळूअभावी शासकीय बांधकामे रखडली असून, आमदार किशोर पाटील यांनी प्रशासनाविरुद्ध दंड थोपटले आहे.
वाळू लिलाव न झाल्याने शासकीय बांधकामे विकासकामे रखडली असून, ७ जानेपर्यंत वाळू परवाना न दिल्यास शासकीय बांधकामे विकासकामांसाठी गिरणा नदी पात्रातून स्वत: वाळू उपलब्ध करून देईन, तेव्हा कोण आडवा येतो ते पाहून घेईन, असा सज्जड इशारा आमदार किशोर पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. वाळूशिवाय बांधकामे होऊ शकत नाही, मार्च महिण्यात लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागू होईल. तेव्हा विकासकामे रखडली असून, प्रशासन गांभिर्याने घेत नाही. राज्यात वाळूअभावी बांधकामे ठप्प आहेत. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी निंबाळकर यांना वेळोवेळी मागणी करूनही निर्णय होत नाही. वाळूसाठी कामे खोळंबली आहेत. तेव्हा प्रशासनाने सोमवारपर्यंत वाळूचे परवाने द्यावेत अन्यथा नदीपात्रात शिवसेना पदाधिकाऱ्यांसह स्वत: उतरून शासकीय ठेकेदारांना वाळू उपलब्ध करून देऊ, तेव्हा प्रशासनातील कोण आडवा येतो ते पाहून घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान, वाळूबंदी असताना आमदार पाटील यांनी विकासकामे होण्यासाठी प्रशासनाविरुद्ध दंड थोपटले असून, प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Web Title: MLAs at Pachora threw sand for sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.