आमदार म्हणतात जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांपुढे हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 12:57 PM2020-01-21T12:57:10+5:302020-01-21T12:57:23+5:30
जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाळूच्या अवैध वाहतुकीबाबत चर्चा झाली. आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ प्रांताधिकारी जिल्हाधिकारी व ...
जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाळूच्या अवैध वाहतुकीबाबत चर्चा झाली. आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ प्रांताधिकारी जिल्हाधिकारी व शासनाचे आदेश मानायला तयार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही उपयोग नाही. अधिकाºयांपुढे जिल्हाधिकारी हतबल असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर जिल्हाधिकाºयांनी ठोस पुरावे द्या, कारवाई करतो, असे आव्हान दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाळूच्या विषयावरही चर्चा झाली. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी वाळू ठेक्यांचे लिलाव झालेले नाहीत. ज्यांची अधिकृत नोंदणी करण्याची मागणी केली आहे, त्यांना मंजुरी मिळत नाही. तर अवैध वाळू वाहतूक मात्र बिनधास्त सुरू आहे. वाळू नाही, म्हणून कोणतेही काम थांबलेले नाही. त्यांना वाळू मिळत आहे. फक्त शासनाचा महसूल बुडत आहे. भुसावळ प्रांताधिकारी मात्र मी करेल तेच खरे. जिल्हाधिकारी, शासन मानत नाही, अशा अविर्भावात वागतात, अशी तक्रार केली.
पाचोरा प्रांतांबाबत विषयही नाही
खंडणी प्रकरणातील आरोपीच्या व्हायरल झालेल्या व्हीडीओ क्लीपमध्ये पाचोरा प्रांताधिकारी तसेच तहसीलदार कैलास तावडे यांचे उल्लेख असतानाही त्यावर मात्र चर्चा झाली नाही.
रात्री १२ वाजता मिळाला नॉन-क्रीमीलेअर दाखला
वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनीही भुसावळ प्रांताधिकाºयांकडून एका विद्यार्थ्याला नॉन-क्रीमीलेअर दाखला घेण्यासाठी कसा त्रास झाला ते सांगत जिल्हाधिकाºयांनी लक्ष घातल्याने रात्री १२ वाजता दाखला मिळाल्याचे सांगत जिल्हाधिकाºयांचे आभार मानले.