आमदारांच्या वाहनाला अपघात : चार फूट उंचावरून उडी घेत कार मधून बाहेर पडले आमदार डॉ. सतीश पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:03 PM2019-06-02T12:03:05+5:302019-06-02T12:03:37+5:30
दुचाकीस बचावण्याच्या प्रयत्नात तारांवर धडकले वाहन
पारोळा, जि. जळगाव : मुंबई येथून पक्षाची बैठक आटोपून गावाकडे परतणाऱ्या आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या वाहनाला पाळधी, ता. धरणगावनजीक अपघात होऊन ते बालंबाल बचावले. अपघातात त्यांचे वाहन डीपीच्या तारांवर चढल्याने आमदारांनी चार फूच उंचावरून उडी घेत ते वाहनातून बाहेर पडले.
डॉ. सतीश पाटील हे मुंबई येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आटोपून रेल्वेने रविवारी सकाळी जळगाव येथे आले. तेथून ते त्यांच्या वाहनाने पारोळ््याकडे जात असताना पाळधीनजीक एका वळणावर समोर अचानक दुचाकी आली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरल नियंत्रण सुटले व वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत डीपीच्या खांबाला ताण दिलेल्या तारांवर धडकले. यात वाहनाचे पुढील दोन्ही चाक वर चढले. त्यावेळी वाहनात मागे बसलेले एस.एस. पाटील, स्वीय सहाय्यक भैया माने व रक्षकाने खाली उतरुन वाहनाचा पुढील दरवाजा उघडला. त्या वेळी डॉ. पाटील यांनी उडी घेत बाहेर पडले. त्यानंतर दुसºया वाहनाने ते पारोळा येथे घरी पोहचले.
अपघातानंतर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना धीर दिला.