जळगावात ‘मनसे’ मनपा निवडणुकीपासून लांब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:51 PM2018-07-12T12:51:52+5:302018-07-12T12:52:26+5:30
जळगाव : गेल्या वर्षभरापासून महापौर पद असलेल्या महाराष्ट्र निर्माण सेनेने यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी एकही अर्ज दाखल न करता निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मनपाच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेने ४६ जागा लढवून १२ जागांवर विजय मिळविला होता. त्यात गेल्या वर्षभरापासून मनसेकडे महापौरपदही होते. त्यामुळे या निवडणुकीत बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मनसे किती उमेदवारी अर्ज दाखल करते याकडे लक्ष लागलेले होते. मात्र शेवटपर्यंत एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही.
सध्या सुरू असलेल्या घडामोडी पाहता मनसेने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.
- जमील देशपांडे, जिल्हा सचिव, मनसे.