जळगावात गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात मनसेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2017 02:58 PM2017-03-04T14:58:14+5:302017-03-04T14:58:37+5:30

घरगुती गॅस सिलिंडरमध्ये प्रचंड दरवाढ केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

MNS movement against gas cylinder hike in Jalgaon | जळगावात गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात मनसेचे आंदोलन

जळगावात गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात मनसेचे आंदोलन

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. 4 -  घरगुती गॅस सिलिंडरमध्ये प्रचंड दरवाढ केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यामध्ये रिकामे गॅस सिलिंडर उलटे ठेवून चुलीवर ‘बिरबलाची खिचडी’ शिजवण्यात आली. या वेळी दरवाढीविरोधात घोषणाही देण्यात आल्या. 
 
या संदर्भात जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल व गॅसचे दर स्थिर असताना अचानक केलेली दरवाढ सर्वसामान्य जनतेवर अन्याय आहे. यात गोरगरीबांचा विचार केलेला नाही. ही दरवाढ मागे न घेतल्यास जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. 
 
सकाळचे जेवण दुपारपर्यंत शिजणार
गॅस दरवाढीविरोधात आंदोलन छेडताना खाली चूल पेटवून ब-याच उंचीवर एका मातीच्या भांड्यात खिचडी शिजवण्यासाठी ठेवण्यात आली व सकाळी सुरुवात केलेल्या या स्वयंपाकाला या सरकारमुळे दुपार तरी होईल, असा निषेध या वेळी करण्यात आला. 
 
या वेळी मनसेचे जिल्हा सचिव अ‍ॅड. जमील देशपांडे, अनंत जोशी, आशीष सपकाळे, संदीप मांडोळे, गणेश इंगळे, जितेंद्र करोसिया, दिलीप सुरवाडे, सूरज पवार, वैशाली विसपुते, हर्षदा पाटील, नीता राणे, शीतल माळी, शोभा कोळी आदी उपस्थित होते. 
 

Web Title: MNS movement against gas cylinder hike in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.