कोल्हे हिल्स परिसरात पाण्यासाठी ‘मनसे’चा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:15 AM2021-04-06T04:15:05+5:302021-04-06T04:15:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोल्हे हिल्स् परिसर, सावखेडा शिवारात पिण्याच्या पाण्याची समस्या वर्षानुवर्षे कायम असून प्रशासकीय दुर्लक्षाने रहिवाशांसमोर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोल्हे हिल्स् परिसर, सावखेडा शिवारात पिण्याच्या पाण्याची समस्या वर्षानुवर्षे कायम असून प्रशासकीय दुर्लक्षाने रहिवाशांसमोर पाणीबाणी निर्माण झाली आहे. अशात आता मनसेने यात पुढाकार घेऊन येत्या दहा दिवसांत पाण्यासह विविध समस्या सुटल्या नाहीत तर आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या परिसरातील नागरिक ५ वर्षांपासून विविध समस्या कायम आहेत, त्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. उन्हाळ्यात बोअरवेल आटल्यामुळे परिस्थती अधिकच बिकट झाली आहे. त्यामुळे आम्ही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. मनपाकडूनही कसल्याच सुविधा मिळत नाही, रहिवासी नियमित कर भरत असताना प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे ‘मनसे’ने निवेदनात म्हटले आहे. यावेळी मनसेचे रस्ते, साधन, सुविधा व आस्थापना विभाग जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शहर उपसंघटक विशाल कुमावत, तालुका उपसंघटक महेश माळी उपस्थित होते.