विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी मनसेची तिसरी आघाडी
By Admin | Published: March 24, 2017 04:42 PM2017-03-24T16:42:20+5:302017-03-24T16:42:20+5:30
नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील विद्यापीठांमधील विविध प्राधिकरणाच्या नवीन मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवडय़ात सुरु होणार आहे
नवीन विद्यापीठ कायदा : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मोर्चेबांधणी
जळगाव, दि.24- नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील विद्यापीठांमधील विविध प्राधिकरणाच्या नवीन मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवडय़ात सुरु होणार आहे. यासाठी मनसेने तिसरी आघाडी करीत निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरु केली आहे. पदवीधर मतदार संघासोबतच प्राध्यापक व संस्थाचालक या मतदारसंघासाठी सध्या जोरदार मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
राज्य शासनाकडून 1 मार्च पासून विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर सर्व प्राधिकरणांच्या निवडणुका घेण्याची सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्याआधी दिलीप रामू पाटील यांच्या नेतृत्वातील विद्यापीठ विकास मंच व माजी महापौर विष्णु भंगाळे यांच्या नेतृत्त्वातील विद्यापीठ विकास आघाडीच्या उमवि निवडणूकांसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत स्वतंत्र निवडणूक कार्यालय देखील तयार करण्यात आले असून, प्रा.आर.एल.पाटील यांच्याकडे या कार्यालयाची जबाबदारी सोपविल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पदवीधर मतदार संघाच्या 10 जागांसह संस्थाचालकांच्या निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी मनसेचे जिल्हा सचिव जमील देशपांडे यांनी दर्शविली आहे.