‘माझे कुटुंंब माझी जबाबदारी मोहिमें’तर्गत सर्व्हेक्षणासाठी मोबाईल अ‍ॅपचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 06:45 PM2020-09-19T18:45:35+5:302020-09-19T18:56:09+5:30

माझे कुटुंंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत ५० वर्षे वयापेक्षा जास्त वयोवृद्ध असलेल्या अडीच हजार वृध्दांचे नुकतेच पल्स आॅक्सिमीटर व इन्फ्रारेड थमार्मीटरने तपासणी करून सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

Mobile app training for surveys under 'My Family My Responsibility Campaign' | ‘माझे कुटुंंब माझी जबाबदारी मोहिमें’तर्गत सर्व्हेक्षणासाठी मोबाईल अ‍ॅपचे प्रशिक्षण

‘माझे कुटुंंब माझी जबाबदारी मोहिमें’तर्गत सर्व्हेक्षणासाठी मोबाईल अ‍ॅपचे प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देजिल्हा आरोग्य विभागाचे डॉ.नलावडे यांनी दिले कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणपाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

रावेर : माझे कुटुंंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत शहरात सर्व्हेक्षण करणाºया न.पा.च्या पथकातील अंगणवाडी सेविका, शिक्षक व न.पा.कर्मचाऱ्यांना जिल्हा आरोग्य यंत्रणेतील समुपदेशक डॉ.नलावडे यांनी सर्व्हेक्षणासंबंधी मोबाईल अ‍ॅपवर अद्ययावत माहिती कशी तत्परतेने सादर करायची? यासंदर्भात प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण वर्गाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले होते.
शहरातील माझे कुटुंंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत ५० वर्षे वयापेक्षा जास्त वयोवृद्ध असलेल्या अडीच हजार वृध्दांचे नुकतेच पल्स आॅक्सिमीटर व इन्फ्रारेड थमार्मीटरने तपासणी करून सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. त्यात संशयित आढळून आलेल्या पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाधिकाºयांनी आदेशित केलेले मिशन फत्ते करण्यासाठी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याबाबत प्रस्तावित केले.
डॉ.थोरबोले यांनी घरोघरी जाऊन जास्तीत जास्त तपासणी करून सामाजिक भीतीपोटी माहिती दडवणाºया रुग्णांचा धांडोळा घेऊन त्यांच्यावर तातडीने औषधोपचार करून मृत्यूदर घटवण्यासाठी व कोरोनाच्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ‘माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम आॅनलाईन मोबाईल अ‍ॅप्सचा वापर करून यशस्वीपणे राबवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी तहसीलदार उषाराणी देवगुणे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे व महिला बालकल्याण समन्वयक नितीन महाजन आदी उपस्थित होते.
दरम्यान, डॉ.नलावडे यांनी उपस्थित शिक्षक, अंगणवाडी सेविका व न.पा.कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले.

Web Title: Mobile app training for surveys under 'My Family My Responsibility Campaign'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.