काऊंटरवर ठेवलेला मोबाईल लांबविणारा पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 08:36 PM2020-12-26T20:36:47+5:302020-12-26T20:36:57+5:30
एमआयडीसी पोलिसांची कारवाई : संशयिताची कारागृहात रवानगी
जळगाव : काशिनाथ हॉटेलच्या काऊंटरवर ठेवलेल्या मोबाईल चोरीच्या प्रकरणात शनिवारी एमआयडीसी पोलिसांनी अमोल सोपान टोंगळे (२८, रा. रामनगर, मेहरूण) याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, सुनावणीअंती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पिंपळगाव येथील विशाल अशोक सरोदे हा तरूण कामाच्या निमित्ताने २३ डिसेंबर रोजी हॉटेल काशिनाथ लॉजजवळ आला होता. नंतर हॉटेलच्या काऊंटर मोबाईल ठेवून चर्चा करत असताना अज्ञात चोरट्याने त्याचा मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, मुदस्सर काझी, सचिन पाटील यांनी संशयित आरोपी अमोल सोपान टोंगळे याला रामनगरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. नंतर न्यायालयात हजर केले असता न्या. एन.के.पाटील यांनी त्याचा जामीन फेटाळून कारागृहात रवानगी केली आहे.