धावत्या रेल्वेतून मोबाईलची चोरी

By admin | Published: January 18, 2017 11:30 PM2017-01-18T23:30:46+5:302017-01-18T23:30:46+5:30

टोळी सक्रिय : सुरतच्या तरूणाचा मोबाईल लांबविला

Mobile theft by running train | धावत्या रेल्वेतून मोबाईलची चोरी

धावत्या रेल्वेतून मोबाईलची चोरी

Next


जळगाव: धावत्या रेल्वेतून प्रवाशांचे मोबाईल लांबविणारी टोळी पुन्हा सक्रीय झाली असून जळगावात मार्केटींगसाठी आलेल्या एका तरुणाचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबविण्यात आल्याची घटना बुधवारी उघड झाली.दिवसभर पोलिसांकडे हेलपाटे मारल्यानंतरही याबाबत गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून ही टोळी रेल्वे स्थानक व परिसरात कार्यरत असून याकडे पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचा आरोप होत             आहे.
सुरत येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असलेले अजय बारसी (रा.सुरत) व शरद पाटील (रा.अमळनेर) हे दोन्ही तरुण मार्केटींग व प्रशिक्षण देण्यासाठी मंगळवारी सुरत-भुसावळ पॅसेंजरने जळगावात आले.
दिवसभराचे काम आटोपल्यानंतर संध्याकाळी शरद पाटील याच्याकडे अमळनेर येथे जाण्यासाठी ते संध्याकाळी 6.45 वाजता भुसावळ-सुरत पॅसेंजर गाडीत चढत असताना एका चोरटय़ाने अजयच्या खिशातील मोबाईल लांबवला. हा प्रकार लक्षात आला तेव्हा गाडी सुरु झालेली     होती.
अनेक प्रवाशांचे लांबवले मोबाईल
स्टेशन परिसरातच वास्तव्याला असलेल्या शहरातील तरुणांची एक टोळी येथे कार्यरत आहे. या टोळीने चालत्या गाडीतून अनेक प्रवाशांचे मोबाईल लांबविले आहेत. विशेष म्हणजे दरवाजाजवळ थांबलेले व पायरींवर बसलेल्या प्रवाशांचेच मोबाईल चोरुन ही टोळी पसार होते. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अमळनेर येथील दिनेश बागडे या तरुणाचा मोबाईल लांबवला होता, तेव्हा चोरटय़ांचा पाठलाग करताना बागडेचा पाय कापला गेला होता तर भुसावळ रस्त्यावरही एक प्रवाशी जखमी झाली होता.
 लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा बल व शहर पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले गुन्हेगारच हा प्रकार करतात. असे असतानाही या तिन्ही यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात नाही.

पोलिसांचा हद्दीचा वाद
सकाळी जळगावात यायचेच असल्याने अजय व शरद हे दोन्ही जण संध्याकाळी अमळनेर येथे निघून गेले. सकाळी जळगावात आल्यावर दोघांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. तेथे ठाणे अमलदाराने ही घटना आमच्या हद्दीत नाही असे सांगून लोहमार्ग पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला.त्यामुळे या तरुणांनी लोहमार्ग पोलीस स्टेशन गाठले. तेथे तरुणाकडून हकीकत ऐकून घेत पक्के बील आणल्याशिवाय गुन्हा दाखल करता येणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली. त्यामुळे दिवसभर फिरवाफिरव झाल्यावरही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे अजय व शरद हे दोन्ही तरुण निराश होवून माघारी परतले.
 

Web Title: Mobile theft by running train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.